स्वप्नातील घराचं स्वप्न झालं पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

शहराच्या सर्व भागांतील गृहप्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असलेल्या ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेल्या दोनदिवसीय प्रदर्शनास अनेकांनी भेट देत घराची खरेदी करीत आपले स्वप्नही पूर्ण केले.

पुणे - शहराच्या सर्व भागांतील गृहप्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असलेल्या ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेल्या दोनदिवसीय प्रदर्शनास अनेकांनी भेट देत घराची खरेदी करीत आपले स्वप्नही पूर्ण केले. 

शहराच्या भोवताली सुरू असलेले आणि पुण्याबाहेरील प्रकल्पांचीही सविस्तर माहिती या प्रदर्शनात दिली आहे. १५ लाखांपासून एक कोटीपेक्षा अधिक किमतीची घरे यामध्ये बघण्यास मिळाली. यामध्ये ३० हून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या १५० हून अधिक प्रकल्पांची माहिती दिली आहे. घर घेताना मनात अनेक शंका असतात. तसेच, आपल्या बजेट व गरजेनुसार कुठे व कोणत्या प्रकल्पात घर घ्यायचे, याबाबत अनेक प्रश्‍न पडतात. घर घेताना आपली काही फसवणूक तर होणार नाही ना, अशी भीती असते. मात्र, या सर्व शंकांचे ‘एक्‍स्पो’त निरसन करण्यात आले. ग्राहकांना काय हवे आहे, याची काळजी बांधकाम व्यावसायिकांनी घेतली. त्यामुळे आमचा घरखरेदीचा मार्ग मोकळा झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

या प्रदर्शनामध्ये चांगले प्रकल्प व अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या बजेटनुसार प्रकल्प निवडणे सोपे होते. ‘सकाळ’ने हा ‘एक्‍स्पो’ आयोजित केला आहे, असे म्हटल्यावर घर घेताना कोणतीही भीती मनात राहत नाही. मी यापूर्वी ‘एक्‍स्पो’च्या माध्यमातून माझ्या स्वतःच्या घराचे स्वप्न साकार केले आहे. 
- गौतम साबळे, ग्राहक

कुठे गुंतवणूक करणे योग्य राहील, याची माहिती घेण्यासाठी मी ‘एक्‍स्पो’ला भेट दिली. अनेक पर्याय उपलब्ध असल्याने त्यातील दोन ते तीन प्रकल्प मला आवडले आहेत. त्यातील माझ्या बजेटनुसार मी एक घर निवडणार आहे. त्यामुळे येथे येऊन चांगला अनुभव मिळाला. 
- अवधूत अत्रे, ग्राहक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Vastu Expo 2019