चिंचवडमध्ये गृहखरेदीसाठी सुवर्णसंधी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

येत्या शनिवारपासून सलग दोन दिवस म्हणजे ५ आणि ६ ऑक्‍टोबर रोजी ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटर, चिंचवड येथे ‘सकाळ माध्यम समूहा’ने भव्य ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’चे आयोजन केले आहे. शहराच्या विविध भागांतील रेरा नोंदणीकृत गृहप्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा समावेश या प्रदर्शनात आहे.

पिंपरी - दसऱ्याच्या मुहूर्तावर फायद्यात घर घेण्याची सुवर्णसंधी पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार आहे.

कारण, येत्या शनिवारपासून सलग दोन दिवस म्हणजे ५ आणि ६ ऑक्‍टोबर रोजी ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटर, चिंचवड येथे ‘सकाळ माध्यम समूहा’ने भव्य ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’चे आयोजन केले आहे. शहराच्या विविध भागांतील रेरा नोंदणीकृत गृहप्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा समावेश या प्रदर्शनात आहे.

मोशी-आळंदी रोडवर स्प्लेंडीड पार्क प्रकल्पाचा प्रारंभ होत आहे. खास आपल्या ग्राहकासाठी ११ हजार रुपये टोकन भरून नोंदणी करण्याची संधी देत आहे.
- वसंत काटे, चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्‍टर, यशदा रिॲलिटी ग्रुप

वास्तू प्रदर्शनाला मिळणारा प्रतिसाद हा नेहमीच उल्लेखनीय असतो. या प्रदर्शनाच्या निमित्ताने ग्राहकांना स्पॉट बुकिंगवर आकर्षक सवलतीचा फायदा घेता येणार आहे.
- श्रीकांत भोंडवे, संचालक, श्री धर्मराज डेव्हलपर्स

‘ऐश्‍वर्यम हमारा’ हा प्रधानमंत्री आवास योजनेतील पिंपरी-चिंचवड महापालिकेसोबत ‘पीपीपी’मधील पहिला गृहप्रकल्प असल्याने याला स्टॅम्प ड्यूटी माफ असणार आहे. घर घेण्याची हीच योग्य वेळ आहे. 
- सतीश आगरवाल, संचालक, ऐश्‍वर्यम हमारा

चिखली येथील मिस्टी ग्रीन्समध्ये २ व ३ बीएचके प्रीमियम फ्लॅट घेण्याची संधी ग्राहकांना आहे. आकर्षक व दर्जेदार, वेळेवर प्लॅटचा ताबा देणे हे पृथ्वी डेव्हलपर्सचे वैशिष्ट्य आहे.
- तुषार लुणावत, संचालक, पृथ्वी डेव्हलपर्स

डांगे चौक व वाकड परिसरात सर्व वयोगटासाठी आकर्षक सोयीसुविधा व सवलतीचा दर अशा प्रकल्पामुळे बजेटनुसार घर घेण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.
- केतुल सोनिगरा, संचालक, श्री सोनिगरा रिअलकॉन

ग्राहकांना त्यांचे स्वप्नातील घर देण्यासाठी फरांदे स्पेसेस आकर्षक प्रकल्प सादर करणार आहे. प्रदर्शनाला पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकाने भेट द्यावी. 
- आकाश फरांदे, संचालक,  फरांदे स्पेसेस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Vastu Expo 2019