निवड करा घराची...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

काही जणांना मनपसंत घरात राहण्यासाठी वाट पाहत बसावे लागते, घर निवडायला पर्याय लगेच मिळत नाहीत. पण, या सर्व प्रश्‍नांवर प्रभावी तोडगा म्हणून ‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘वास्तू एक्‍स्पो’चे आयोजन केले आहे.

पुणे - काही जणांना मनपसंत घरात राहण्यासाठी वाट पाहत बसावे लागते, घर निवडायला पर्याय लगेच मिळत नाहीत. पण, या सर्व प्रश्‍नांवर प्रभावी तोडगा म्हणून ‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘वास्तू एक्‍स्पो’चे आयोजन केले आहे. 

शनिवारपासून सलग दोन दिवस म्हणजे१२ आणि १३ ऑक्‍टोबर रोजी शिवाजीनगर येथील प्राइड हॉटेल येथे ‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’चे आयोजन केले आहे. यामध्ये परवडणाऱ्या घरांपासून आलिशान घरांपर्यंत, सर्व काही, शिवाय घरासोबत मिळणाऱ्या सुविधा, ॲमेनिटीज्‌, लोकेशन, आसपासचा परिसर असे विविध पर्याय बघण्यासाठी हा एक्‍स्पो प्रभावी ठरणार आहे. साधारणत: १५ लाखांपासून १ कोटीपर्यंत बजेट असलेली घरे, तसेच एनए प्लॉटस यामध्ये बघावयास मिळणार आहे.

एक्‍स्पोमध्ये ३० हून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या १५० हून अधिक प्रकल्पांची माहिती उपलब्ध होणार आहे. साधारण पुण्याच्या चौफेर उभे राहणारे प्रकल्प आणि पुण्याबाहेरील प्रकल्पांचीही सविस्तर माहिती इथे मिळणार आहे. शहर व परिसरांतील कमर्शिअल व रेसिडेन्शिअल प्रोजेक्‍टसची माहिती यामध्ये उपलब्ध आहे.

पुण्याभोवतीचे प्रकल्प, त्यांचे बजेट, कोणत्या प्रकल्पांमधून कोणत्या सुविधा मिळणार, कोणत्या ठिकाणी पैसे गुंतविणे जास्त फायद्याचे राहू शकते, तेथील परिसराचा विकास कसा होतो आहे, अशा विविध प्रश्‍नांसोबतच रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचे विविध पर्याय आपल्याला पाहता येणार आहेत. तुमचे बजेट, इच्छा, आवड, सोय अशा प्रत्येक प्रश्‍नाचे योग्य उत्तर या एक्‍स्पोमधून मिळू शकते, त्यामुळे हा एक्‍स्पो तुमच्या मनातील घराची निवड करायला फायदेशीर ठरू शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Vastu Expo 2019