सर्व अभ्यासक्रमांची माहिती एकाच छताखाली

सर्व अभ्यासक्रमांची माहिती एकाच छताखाली

पुणे - दहावी, बारावी झाली. आता शिक्षणाची पुढची दिशा कोणती?... असा प्रश्‍न पडला असेल, तर त्याचं उत्तर ‘सकाळ’ने दिलं आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा मिळावी म्हणून ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’ आजपासून सुरू झाला आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे पुढील दोन दिवस (ता. ८ व ९) विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी शैक्षणिक माहिती उपलब्ध होणार आहे. त्याबरोबर करिअरबाबत विविध शिक्षण संस्थांकडून मार्गदर्शनही मिळणार आहे. 

या एक्‍स्पोचे मुख्य प्रायोजक युनिक ॲकॅडमी, उपप्रायोजक मराठवाडा मित्र मंडळ आणि झील एज्युकेशन सोसायटी, तर सहप्रायोजक सृजन कॉलेज ऑफ डिझाइन व संदीप युनिव्हर्सिटी हे आहेत. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ‘सकाळ’चे बिझनेस हेड (इव्हेंट) राकेश मल्होत्रा, वरिष्ठ सरव्यवस्थापक शैलेश पाटील आणि सरव्यवस्थापक उमेश पिंगळे उपस्थित होते. 

सर्व अभ्यासक्रमांची एकाच छताखाली माहिती मिळत असल्याने विद्यार्थी आणि त्यांचे पालक प्रदर्शनातील वेगवेगळ्या संस्थांच्या स्टॉलवर जाऊन माहिती घेतना दिसत होते. कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, विधी, फार्मसी, अभियांत्रिकी, माहिती-तंत्रज्ञान, हेल्थ केअर, फॅशन डिझाइनिंग आदी अभ्यासक्रमांबद्दल विद्यार्थी चौकसपणे माहिती घेत होते. सायंकाळी प्रदर्शनात येणाऱ्या पालकांची गर्दी आणखी वाढली. विविध अभ्यासक्रमांची माहिती घेण्याबरोबरच कोणत्या क्षेत्रात करिअरच्या चांगल्या संधी आहेत, सध्या रोजगारासाठी योग्य ठरणारे क्षेत्र कोणते याविषयी ते शिक्षणतज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेत होते. सर्व अभ्यासक्रमांची माहिती आणि करिअरची माहिती एकाच ठिकाणी मिळत असल्याने विद्यार्थी व पालक याबद्दल समाधान व्यक्त करीत होते. 

‘सकाळ’च्या एज्युकेशन एक्‍स्पोमुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शिक्षण संस्था आणि त्यांचे अभ्यासक्रम याविषयी विनामूल्य मार्गदर्शन मिळते, ही खूप सकारात्मक बाब आहे. यातून विद्यार्थ्यांना करिअर विषयाची योग्य दिशा मिळेल, अशी खात्री वाटते. अनेक तज्ज्ञांकडून येथे मार्गदर्शन मिळणार असल्याने त्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी मदतही मिळेल. 
- विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य

‘एज्युकेशन एक्‍स्पो’ हा ‘सकाळ’चा स्तुत्य उपक्रम आहे. यातून विविध क्षेत्रांतील करिअरची वैविध्यपूर्ण माहिती मिळते. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनाही स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक अभ्यासक्रम आणि करिअरची दिशा निवडण्याबाबत योग्य मार्गदर्शन मिळते. 
- तुकाराम जाधव, संचालक, द युनिक ॲकॅडमी 

एकाच छताखाली वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची माहिती मिळणे, हे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाचे आहे. आपल्या पाल्याचे भवितव्य आणि त्याची योग्य दिशा ठरविण्यास यामुळे मदत होईल. हेच या एक्‍स्पोचे फलित म्हणता येईल. 
- डॉ. सुनील देशपांडे, प्राचार्य,  मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग

खूप चांगला, समाजहिताचा हा एज्युकेशन एक्‍स्पो आहे. यामुळे एकाच व्यासपीठावर सर्व शैक्षणिक माहिती उपलब्ध झाली. याद्वारे विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा मिळणार आहे. 
- दत्तात्रेय टिळेकर, पालक 

खूप चांगली आणि वेगवेगळ्या क्षेत्रांतील माहिती खूप कमी वेळेत उपलब्ध झाली. विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा होणार आहे. 
- रश्‍मी राजोपाध्ये, पालक

बारावीनंतर काय, पुढे करिअरच्या कोणत्या संधी आहेत, नोकरी कशी असणार आहे, त्या संदर्भात प्रत्येक कोर्सचे मार्गदर्शन मिळाले. परदेशात नोकरी कशी असणार आहे व त्याची काय संधी असणार आहे, याबद्दल विविध संस्थांशी बोलता आले. 
- सोहम होनराव, विद्यार्थी 

एक्‍स्पोमधून कोणत्या ठिकाणी ॲडमिशन घ्यावे, याचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले. मला पायलट होण्याचे स्वप्न आहे व त्याबद्दल मला सर्व माहिती मिळाली. त्याचबरोबर कौशल्य विकास शिक्षणाने मी लगेच बारावीनंतर माझे उत्पन्न कमवू शकते, याबद्दलही मार्गदर्शन मिळाले. 
- समृद्धी पाठक, विद्यार्थिनी 

आज होणारे मार्गदर्शनपर सेमिनार
  वक्ते - विवेक वेलणकर
  केव्हा - सकाळी १०.३० वाजता
  विषय - आर्ट, कॉमर्स, डिझाईन, लॉ आणि डिफेन्समधील करिअर
  वक्ते - मकरंद टिल्लू
  केव्हा - सकाळी ११.३० वाजता
  विषय - आनंदाची बेरीज, यशाचा गुणाकार!
  वक्ते - संतोष रासकर
  केव्हा - दुपारी ४.३० वाजता
  विषय - डिझायनिंग क्षेत्रातील करिअर संधी
  वक्ते - प्रदीप खांदवे
  केव्हा - सायं. ६.३० वाजता
  विषय - पॉलिटेक्‍निक व इंजिनिअरिंगमधील करिअर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com