Sakal Vidya Expo : उलगडल्या भावी अधिकाऱ्यांच्या प्रेरक यशोगाथा, भावी अधिकाऱ्यांचे कानमंत्र

निमित्त होते चाणक्य मंडल परिवाराच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कौतुक समारंभाचे.
Sakal Vidya Expo
Sakal Vidya Exposakal

Sakal Vidya Expo - कुणी चार, तर कुणी सात वर्षे संघर्ष केला; काहींनी नोकरीचा राजीनामा देत पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेसाठी दिला; मुलगा खचू नये म्हणून आईने देव पाण्यात ठेवले, तर कुणी खानावळीतील मुलीचे पालक बनले...विद्यार्थी ते अधिकारी असा संघर्षमय प्रवास सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पोमध्ये उलगडला.

Sakal Vidya Expo
Mumbai Crime : डोंबिवलीत ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखावर हल्ला

निमित्त होते चाणक्य मंडल परिवाराच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कौतुक समारंभाचे. स्वारगेट येथील गणेश कला-क्रीडा मंच येथे आयोजित कार्यक्रमाला माजी सनदी अधिकारी जगजितसिंग आर्या, डॉ. राकेश कुमार वत्स, डॉ. डी. के. भल्ला, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. बी. शेकटकर, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) संजय कुलकर्णी, मेजर जनरल (निवृत्त) शिशीर महाजन, आर. चंद्रशेखर, कल्पना शर्मा, डॉ. भूषण केळकर, शशांक देवगडकर, क्रांती खोब्रागडे आणि चाणक्य मंडल परिवारचे प्रमुख अविनाश धर्माधिकारी उपस्थित होते.

Sakal Vidya Expo
Pune News : पुण्यात पालखी मिरवणुकीमुळे हे रस्ते बंद, वाहतुक कोणत्या दिशेने वळवणार? इथे वाचा पूर्ण यादी

यावेळी युपीएससीमध्ये नुकतीच निवड झालेल्या निहाल कोरे, यश विशेन, डॉ. पूजा खेडकर, डॉ. अतुल ढाकणे, राजश्री देशमुख, केतकी बोरकर, अनुराग घुगे, करण मोरे, गौरव गायकवाड, मानसी साकोरे, रितू मीना,आशिष पाटील, सागर खर्डे, आकांक्षा सिंग, केवल मेहता, आयुष गुप्ता, गौरव कायंदेपाटील, डॉ. अंजली गर्ग, डॉ. आदित्य शर्मा, डॉ. कश्मिरा संख्ये आदींचा सत्कार करण्यात आला. या भावी अधिकाऱ्यांनी आपली यशोगाथा आणि संघर्षाची कथा सादर केली.

भावी अधिकाऱ्यांचे कानमंत्र

स्वतःचे मूल्यमापन नको, त्याऐवजी कार्यक्षमता ओळखा. स्पर्धा परीक्षा एक प्रवास असून प्रयत्नपूर्वक मेहनत घेतल्यास आपली वेळे येईल यावर दृढ विश्वास ठेवा. आव्हानातून शिका, सातत्यपूर्ण प्रयत्न करा

पर्यायी योजना (प्लॅन बी) नक्कीच हवी, पण आपले स्वप्न साकारण्यासाठी झोकून देत १०० टक्के प्रयत्न करा.

Sakal Vidya Expo
Pune Crime: पुण्यातील सिंहगड रोडवर डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन तरुणाची हत्या

भीती हीच प्रेरणा बनवा. प्रत्येक गोष्टीत अचूकता ठेवा, स्वतःच्या चुकांचा स्वीकारा करा आणि त्यातून बोध घेत शिका,

मित्र आणि कुटुंबाचा पाठिंबा मिळवा. परीक्षेतील गुणांसाठी नव्हे तर प्रज्ञावंत होण्यासाठी अभ्यास करा.

Sakal Vidya Expo
Mumbai Crime : काकाकडून पुतण्याच अपहरण! मुलाची बंगालमधून सुटका

सनदी अधिकारी म्हणजे राष्ट्रसेवाच आहे. चाणक्य मंडल केवळ शिकवणीचा वर्ग नाही तर चारित्र्यनिर्माणाचे केंद्र आहे. अधिकाऱ्यांनी प्रशासनाबरोबरच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उत्तमता आणत भारतमातेची सेवा करावी. पारदर्शक पद्धतीने समाजाची सेवा करण्याचे वचन भावी अधिकाऱ्यांनी पाळावे. वैयक्तीक पातळीबरोबरच यंत्रणेही पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी करावा.

अविनाश धर्माधिकारी, प्रमुख, चाणक्य मंडल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com