केंद्रीय प्रवेशाविषयी मार्गदर्शन

Sakal-Vidya
Sakal-Vidya

पिंपरी - या वर्षापासून विविध अभ्यासक्रमांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून होणार आहे. प्रवेशासाठी अर्ज करताना पालक व मुलांना अनेक प्रश्‍न असतात. याच अनुषंगाने ‘सकाळ विद्या’, ‘पिंपरी- चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट’ (पीसीईटी) व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ यांच्यातर्फे (एनएमव्हीपीएम) विनामूल्य चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. 

इंजिनिअरिंग, आर्किटेक्‍चर, मॅनेजमेंट, ॲग्रिकल्चर, फार्मसी यासारख्या १६ शाखा आणि त्यामधील ४२ अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन व केंद्रीय पद्धतीने सेतू सुविधा केंद्रातून नियंत्रित केल्या जाणार आहेत. पण ही सर्व प्रक्रिया कशी आहे, कोणत्या शाखेत जायचे हे निश्‍चित झाले तरीही मेरिटनुसार योग्य कॉलेजची निवड कशी करावी याची माहिती विद्यार्थ्यांना असली की ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना गोंधळ होत नाही. त्याचबरोबर शैक्षणिक कर्ज, कटऑफ, स्कॉलरशिप, इंजिनिअरिंग ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया, डिप्लोमानंतर इंजिनिअरिंगची दुसऱ्या वर्षाची प्रवेशप्रक्रिया, सीईटी किंवा जेईईच्या गुणांच्या (पर्सेंटाईल) आधारे कॉलेजची प्राथमिकता कशी ठरवावी व त्यासाठी ऑप्शन फॉर्म कसा भरावा, पीसीएममध्ये ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी गुण असतील तर कोणते पर्याय उपलब्ध आहेत, या विषयावर प्रा. शीतलकुमार रवंदळे, तर आर्किटेक्‍चरमधील करिअर, प्रवेश व कॉलेजचे पर्याय यावर डॉ. महेंद्र सोनवणे तसेच प्रवेशासाठी आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता, बारावीनंतर उपलब्ध संधी व कॉलेजचे पर्याय याविषयी प्रा. विजय नवले मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थी व पालकांच्या या प्रवेश प्रक्रियेसंबंधी असलेल्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे या चर्चासत्रातून मिळतील. ऑनलाइन फॉर्म भरताना होणाऱ्या चुका कशा टाळाव्यात याचे प्रात्यक्षिकही या वेळी दाखवण्यात येईल. नक्कीच सहभागी व्हा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com