'जेईई', 'नीट'साठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

पुणे : जेईई व नीट परीक्षांसाठी अनेक मुले भरपूर अभ्यास करतात; मात्र प्रत्यक्षात निकाल चांगला लागत नाही. अशा वेळी योग्य मार्गदर्शन व अभ्यास तंत्र आवश्‍यक असते. याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी 'सकाळ विद्या' आणि आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्रातर्फे आज (ता. 1) सायंकाळी 5.30 वाजता स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा मंच येथे विशेष चर्चासत्र होत आहे. 

अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीच्या जेईई व नीटसारख्या प्रवेश परीक्षांचा नेमका अभ्यास, अभ्यासक्रम, अभ्यासाचे तंत्र, परीक्षांचे स्वरूप, त्यात भविष्यात होणाऱ्या बदलांचे स्वरूप, आठवी-नववीपासूनच या प्रवेश परीक्षांची तयारी करताना नेमक्‍या कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे व सीईटी व जेईई यांचा संयुक्तरीत्या अभ्यास या विषयांवर हे चर्चासत्रात होईल. येत्या काळात वैद्यकीय प्रमाणेच अभियांत्रिकीसाठी राष्ट्रीय पातळीवर एकच प्रवेश परीक्षा होणे अपेक्षित आहे तसेच सीईटी आणि जेईईचा अभ्यासक्रमातील फरक कमी झाला आहे तो नेमका काय आहे, याबाबत विशेष माहितीही विद्यार्थ्यांना मिळणार आहे. 

या परीक्षांना सामोरे जाताना योग्य अभ्यासतंत्र वापरून योग्य निर्णयापर्यंत कसे जावे, यासंवंधी 'आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे' संस्थापक संचालक दुर्गेश मंगेशकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आठवी, नववी, दहावी व अकरावीचे विद्यार्थी व पालकांसाठी चर्चासत्र उपयुक्त ठरणार आहे. 

चर्चासत्राविषयी..... 

  • व्हा : रविवार, ता. 1 एप्रिल 
  • कधी : सायंकाळी 5.30 वाजता 
  • कुठे : गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट 
  • मार्गदर्शक : प्रा. दुर्गेश मंगेशकर 
  • विद्यार्थी व पालकांसाठी प्रवेश विनामूल्य 
  • संकेतस्थळावर नोंदणी आवश्‍यक : www.vidyaseminars.com 
  • नोंदणीसाठी संपर्क : 9923645679 
Web Title: Sakal Vidya organises JEE, NEET guidance program in Pune