Sakal Vidya School Expo 2024 : पालकांनीही घेतला ‘शिकू आनंदेचा अनुभव’

‘सकाळ विद्या स्कूल एक्स्पो २०२४’ प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद
sakal vidya school expo 2024
sakal vidya school expo 2024sakal

कोथरूड - आमच्या बाळाला आम्ही चांगले ओळखतो. त्याला समजून घेत, प्रगतीकडे वाटचालीची दिशा देतील, असा प्रशिक्षित शिक्षक वर्ग, शालेय वातावरण, अभ्यासक्रम कुठे भेटेल, ही आम्हाला चिंता आहे. यासारखे अनेक प्रश्न, शंका मनात घेऊन आलेल्या पालकांना सर्व प्रश्नांची उत्तरे मिळत होती. एवढेच नव्हे, तर ‘शिकू आनंदेचा अनुभव’ पाल्याबरोबर पालक घेत होते.

‘सकाळ’ आयोजित ‘सकाळ विद्या स्कूल एक्स्पो २०२४’ या शैक्षणिक प्रदर्शनामध्ये शहरातील नामांकित शिक्षण संस्था व सुविधांची माहिती दिली जात आहे. बोगनवेल फार्म, म्हात्रे पुलाजवळ, डीपी रस्ता येथे सुरु असलेल्या या प्रदर्शनाला पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत हे प्रदर्शन खुले आहे.

प्रदर्शनाचे उद्‍घाटन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्या हस्ते झाले. यावेळी आर्यन्स वर्ल्ड स्कूलचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद लडगे, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल मुळशी पुणेचे विश्वस्त विनायक भोसले आदी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्रीय मंडळातर्फे संध्याकाळी ५ वाजता योगा प्रात्यक्षिके होणार आहे.

कलाकारांची भेट

आज रविवारी संध्याकाळी ५.१५ वाजता ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश देशपांडे, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे व अपूर्वा मोडक स्कूल एक्स्पोला भेट देणार असून संवाद साधणार आहेत.

आई मला शाळेला जायचंय

आपल्या लाडक्या बाळाला कोणत्या शाळेत घालावे, याचा शोध घेत असलेल्या आई-बाबांना आपल्या पाल्याच्या उन्नतीसाठी विश्वासार्ह काय आहे, याचे उत्तर या प्रदर्शनात नक्कीच मिळणार आहे.

अभ्यासक्रम जाणून घेण्यात पालकांचा उत्साह

कधीही पाहिला नाही एवढा मोठा पक्षी, डिस्कव्हरीमध्ये दिसलेला मोठा सरडा, अवघड प्रश्नांची उत्तरे सोपी करणारे खेळ, आनंदाने उड्या मारत, नाचत, गात, पझल (कोडी) सोडवत मिळवलेले बक्षिस, बाहेर प्रचंड गरम होत असताना प्रदर्शनस्थळी थंडाव्याचे आल्हाददायक वातावरण पसरविणारा कुलर याचा आनंद एकीकडे मुले घेत होती. तर दुसरीकडे मुलांचे भवितव्य घडविणारा कोणता अभ्यासक्रम निवडावा, शिक्षणाच्या विविध पद्धती कोणत्या आहेत, संकल्पना कोणती, यांची ओळख पालकांना मिळत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com