‘सकाळ इअर बुक’ लवकरच उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

पुणे - स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडींवर आधारित विचारल्या जाणाऱ्या प्रश्‍नांचे स्वरूप व महत्त्व लक्षात घेऊन प्रशासनात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘सकाळ इअर बुक २०१७’ हे संदर्भ पुस्तक पुढील आठवड्यात प्रकाशित होत आहे. विद्यार्थ्यांची मागणी विचारात घेऊन, या पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू आहे. नोंदणीसाठी सकाळ कार्यालय व निवडक पुस्तक विक्रेत्यांशी संपर्क साधावा. हे पुस्तक घरपोच हवे असल्यास sakalpublications.com व amazon.in वर ऑनलाइन नोंदणी करावी.

‘सकाळ प्रकाशना’च्या या संदर्भ पुस्तकाला संपूर्ण महाराष्ट्रभरातून स्पर्धा परीक्षा, पत्रकारिता, राज्यशास्त्र आदी विषयांच्या विद्यार्थ्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो. 

येत्या वर्षभरात होणाऱ्या एमपीएसी, यूपीएसी परीक्षांकरिता; तसेच बॅंकिंग, विमा, रेल्वे, वन सेवा, संरक्षण सेवा या व इतर महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षांमधील ‘चालू घडामोडी’ या विषयासाठी हे संदर्भ पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. 

पुस्तकात २०१६ मधील महत्त्वाच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, क्रीडा, पर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रांतील घडामोडींची इत्थंभूत माहिती विषयतज्ज्ञांच्या विश्‍लेषणासह दिली आहे. तसेच या महत्त्वाच्या घडामोडींना पूरक नकाशे, फ्लो चार्टस, इन्फोग्राफ्स, तक्ते, छायाचित्रे यांच्या आकर्षक व माहितीपर मांडणीच्या साहाय्याने विषय वाचनीय व आकलन सुलभ करण्यात आला आहे.

केवळ स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्याच नव्हे तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घटनांमध्ये रुची असणाऱ्या वाचकांच्या सामान्य ज्ञानात भर पडेल अशा पद्धतीने दिलेली अचूक माहिती; तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये रुची असणाऱ्या वाचकांसाठीही हे पुस्तक तितकेच संदर्भयुक्त आहे. 

‘सकाळ इअर बुक २०१७’ चे मूल्य रुपये ३५० असून, प्रकाशनपूर्व नोंदणी केल्यास विद्यार्थ्यांना हे पुस्तक रुपये २६५ या सवलत मूल्यात उपलब्ध करून दिले जाईल. महाराष्ट्रामधील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे व ‘सकाळ’च्या सर्व आवृत्त्यांच्या कार्यालयात पुस्तक उपलब्ध असेल. अधिक माहितीसाठी संपर्क ०२०-२४४०५६७८ किंवा ८८८८८४९०५० (सकाळी १० ते सायं. ६).

Web Title: sakal year book