एसटी कामगारांचे पगार ऑगस्टपासून लॉकडाऊन! कामगारांचा आक्रोश

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

प्रशासनाने जुलै महिन्याचे वेतन ऑक्‍टोबरमध्ये देताना सक्तीच्या रजेवर पाठविलेल्या कामगारांपैकी काही कामगारांचे रजा कालावधीचे वेतन कपात केले. त्यामुळे त्या महिन्याचे वेतनही अल्प प्रमाणात मिळाले आहे. कोरोना महामारीत एसटीचे कर्मचारी जिवाची बाजी लावून रात्रंदिवस काम करीत आहेत.

पुणे : अनलॉकनंतर लालपरी सुरू झाल्याने अनेकांचा प्रवास सुखकर झाला आहे. मात्र एसटी महामंडळातील कामगारांचा पगार ऑगस्टपासून लॉक झाला आहे. त्यामुळे कामगारांची आर्थिक परिस्थिती डाऊन झाली असून दिवाळी गोड होणार की नाही, अशा प्रश्‍न त्यांना पडला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

प्रशासनाने जुलै महिन्याचे वेतन ऑक्‍टोबरमध्ये देताना सक्तीच्या रजेवर पाठविलेल्या कामगारांपैकी काही कामगारांचे रजा कालावधीचे वेतन कपात केले. त्यामुळे त्या महिन्याचे वेतनही अल्प प्रमाणात मिळाले आहे. कोरोना महामारीत एसटीचे कर्मचारी जिवाची बाजी लावून रात्रंदिवस काम करीत आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत शासनाच्या आदेशानुसार परराज्यातील मजूर यांना थेट त्यांच्या राज्यात सोडण्याची कामगिरी एसटीने पार पाडली. अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी यांची वाहतूक तसेच सध्या मुंबई बेस्टची बस वाहतूकही एसटी कर्मचारी करीत आहेत. यामध्ये महामंडळाचे बरेचसे कर्मचारी कोरोनाबाधित झालेले असून सुमारे 73 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातील बहुतांशी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अद्याप विम्याचे 50 लाखांची मदत मिळालेली नाही. त्यावेळी आपला प्रपंच कसा चालवावा असा प्रश्न कामगारांसमोर निर्माण झालेला आहे.

''शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता व सण उचल देण्याची कामगार करारात तरतूद असतानाही तिची अंमलबजावणी मंडळाने केलेली नाही. शासकीय कर्मचा-यांना वाढीव पाच टक्के महागाई भत्ता जानेवारीच्या वेतनापासून लागू केलेला आहे. एस. टी. कामगार त्यापासून वंचित आहेत,'' अशी माहिती महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि सचिव हनुमंत ताटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

तब्बल पावणे अकरा लाखाच्या मेफेड्राॅनसह 16 लाखाचा मुद्देमाल जप्त; दोघाना अटक

या आहेत मागण्या 
- ऑगस्टपासूनचे वेतन मिळावे
- शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे महागाई भत्ता व सण उचल द्यावी
- 2018 पासूनचा महागाई भत्ता मिळावा
- मृत्यू कर्मचाऱ्यांची विमा रक्कम त्वरीत अदा करावी

तर कर्मचारी स्वतःच्या घरासमोरच आंदोलन करतील 
''दिवाळीपूर्वी थकीत वेतन, महागाई भत्त्याची थकबाकी आणि शासकीय कर्मचा-यांप्रमाणे सण उचल मिळावी या मागणीसाठी दोन नोव्हेंबर रोजी सर्व जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतरही मागणी पूर्ण न झाल्यास कर्मचारी स्वतःच्या घरासमोर कुटुंबीयांसह नऊ नोव्हेंबर रोजी आक्रोश व्यक्त करतील. तरीही दिलासा मिळाला नाही तर कामगारांना प्रशासनाविरोधात तीव्र संघर्ष करावा लागेल,'' असा इशारा संघटनेने दिला आहे.

''पगार आणि भत्याबाबत संघटनेने वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधलेले आहे. मात्र अद्याप त्या बाबत तरतूद करण्यात आलेली नाही. सध्याच्या एसटीच्या आर्थिक परिस्थितीस कामगार जबाबदार नाहीत. कोरोनाच्या कालावधीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कामगार काम करीत आहे. तरीही त्यांना वेतन मिळत नसल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष वाढला आहे.''
- संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना

पुण्यात हायवेलगत हॉटेलमध्ये सुरू होता वेश्या व्यवसाय; मराठी तरुणीसह दोघींची...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salary of ST workers from August is pending