आरोग्यास हानिकारक पाण्याची बंद बाटल्यांतून विक्री

Water-Bottle
Water-Bottle

पुणे - तुम्ही घरात किंवा ऑफिसमध्ये कधी ‘सील’ केलेली पाण्याची बाटली घेता का? याचे उत्तर ‘हो’ असेल तर सावधान! तुमची फसवणूक होत असल्याची शक्‍यता आहे. कारण पाच रुपयांचे नाणे टाकून दहा लिटर पाणी मिळणाऱ्या केंद्रातून या बाटल्या भरून त्यांची विक्री होत असल्याची खळबळजनक माहिती मिळाली आहे. 

शहरात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानाचा पारा वाढल्याने उन्हाळ्याची चाहूल लागत आहे. वाढत्या उन्हाबरोबरच पुढील तीन ते चार महिने पिण्याच्या पाण्याची मागणी वाढते. या पार्श्‍वभूमीवर आपल्या पोटात जाणारे पाणी किती सुरक्षित आहे, याची प्रकर्षाने काळजी आता प्रत्येक बाटली विकत घेताना घेणे आवश्‍यक आहे, असे मत ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड’च्या (बीआयएस) अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. 

रुपयात दोन लिटर पाणी
धायरीसह शहराच्या वेगवेगळ्या उपनगरांमध्ये पाच रुपयांचे नाणे टाकून दहा लिटर पाणी वितरणाची केंद्रे नव्याने मूळ धरू लागली आहेत. पाच रुपयांची दोन नाणी टाकली तर वीस लिटर पाणी त्यातून मिळते. हे पाणी बाटलीबंद पाणी विक्री करणाऱ्या ब्रॅंडेड कंपनीच्या वीस लिटरच्या जारमध्ये भरून त्याची सर्रास विक्री केली जाते. बाटलीबंद पाणी म्हणून आपण ते खरेदी करतो. पण, प्रत्यक्षात ते जेमतेम ‘फिल्टर’ केलेले असते, अशी माहिती पुढे आली आहे. 

बाटलीबंद पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता राखणे ही ‘एफडीए’ची जबाबदारी आहे. त्यासाठी पाण्याच्या उत्पादन कक्षाची स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याचा दर्जा बारकाईने तपासला जातो. त्यात दोष आढळल्यास उत्पादन थांबविण्यापर्यंतचे आदेश देण्याची तरतूद कायद्यात आहे.
- सुरेश देशमुख, सहआयुक्त (अन्न), एफडीए, पुणे विभाग

कायदा काय सांगतो?
प्रति दिवस दोन हजार लिटर किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादन करणाऱ्या बाटलीबंद पाणी उत्पादक कंपनीला केंद्रीय परवाना आवश्‍यक असतो. त्यापेक्षा कमी उत्पादन क्षमतेच्या कंपनीला राज्य परवाना घेणे बंधनकारक असते. तसेच ‘बीआयएस’चा परवाना अत्यावश्‍यक ठरतो. दरवर्षी याचे नूतनीकरण महत्त्वाचे ठरते.  

बाटलीबंद पाण्यासाठी इथे तक्रार करा
बाटलीबंद पाण्यासाठी तुमची तक्रार ‘एफडीए’कडे करता येते. औंध येथील सयाजीराव गायकवाड संकुलातील पाचव्या मजल्यावर हे कार्यालय आहे. १८००२२२२६५ या टोल फ्री क्रमांकावरही तक्रार नोंदवता येईल.

‘बीआयएस’चे महत्त्व

  • ‘आयएसआय’ मार्क असलेल्या बंद बाटलीतील पाणी घ्यावे.
  • हे पाणी प्रयोगशाळेतून तपासणी केलेले असते.
  • प्रक्रिया केलेल्या पाण्यात जिवाणूंची वाढ होत नाही.
  • व्यवस्थित स्वच्छता असलेल्या ठिकाणी उत्पादन होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com