रेशन दुकानात मीठही मिळणार

नाना पेठ - पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते स्वस्त धान्य दुकानातून आयोडीनयुक्त मीठ विक्रीला सुरवात करण्यात आली. या वेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
नाना पेठ - पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते स्वस्त धान्य दुकानातून आयोडीनयुक्त मीठ विक्रीला सुरवात करण्यात आली. या वेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

पुणे - ‘‘रेशन दुकानातून शिधापत्रिकाधारकांना तांदूळ, गहू, साखर, तूरडाळीसोबतच आता लोह आयोडीनयुक्त मीठही मिळणार आहे. 
मीठामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होऊन पुरुषांबरोबरच महिलाही सशक्त होण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे,’’ असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी केले.

नाना पेठेतील क्रांती ज्योती स्वस्त धान्य दुकानात बापट यांच्या हस्ते मिठाच्या विक्रीला सुरवात करण्यात आली. या वेळी ते बोलत होते. पुरवठा विभागाच्या उपायुक्त नीलिमा धायगुडे, अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष दिलीप गिरमकर, टाटा कंपनीचे अय्यर आदी यावेळी उपस्थित होते.

बापट म्हणाले, ‘‘राज्यात नागपूर आणि पुणे या दोन जिल्ह्यांत रेशन दुकानात मीठ विक्रीला सुरवात झाली आहे. इतर जिल्ह्यांतही ही योजना सुरू करण्यात येईल. पुणे जिल्ह्यात पाच ते १५ वयोगटातील ९८ टक्के महिलांमध्ये रक्तातील लोहाचे प्रमाण कमी आहे. मिठामध्ये हिमोग्लोबिन वाढीसाठी पोषक घटक आहेत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com