शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अजितदादांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे येथील विधानभवनातील (कॉन्सिल हॉल) छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या प्रतिमेला पुष्‍पहार घालून वंदन केले. 

पुणे : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे येथील विधानभवनातील (कॉन्सिल हॉल) छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या प्रतिमेला पुष्‍पहार घालून वंदन केले. 

दिलासादायक, जुन्नर तालुक्यातील ही पाच गावे झाली कोरोनामुक्त

या वेळी कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्‍हे, आमदार अतुल बेनके, आमदार सुनील टिंगरे, विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, उपायुक्‍त संजयसिंह चव्‍हाण आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते. या वेळी उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना शिवराज्यभिषेक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 6 जून रोजी दरवर्षी रायगड किल्ल्यावर मोठ्या उत्साहात सोहळा साजरा केला जातो. देशभरातील शिवभक्त मोठ्या संख्येने रायगड किल्ल्यावर येत असतात. या ठिकाणी तलवारबाजी, दांडपट्टा अशा विविध शस्त्रांच्या कला सादर केल्या जातात. परंतु, या वर्षी असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे रायगडावरील शिवराज्याभिषेक दिन सोहळा रद्द करण्यात आला आहे. मात्र, शिवभक्तांनी आपापल्या घरात थांबून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salutations to Chhatrapati Shivaji Maharaj by Ajit Pawar on the occasion of Shiv Rajyabhishek Day