राजेश सांकला यांचा "समाजभूषण'ने गौरव

अण्णा भाऊ साठे सभागृह - 'समाजभूषण' पुरस्कार देऊन राजेश सांकला यांना सपत्निक गौरवण्यात आले. या वेळी विजयकांत कोठारी, गणपतराज चौधरी, अशोक गोडसे, भाऊसाहेब भोईर, विजय भंडारी, अशोक लोढा यांच्यासह जय आनंद ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.
अण्णा भाऊ साठे सभागृह - 'समाजभूषण' पुरस्कार देऊन राजेश सांकला यांना सपत्निक गौरवण्यात आले. या वेळी विजयकांत कोठारी, गणपतराज चौधरी, अशोक गोडसे, भाऊसाहेब भोईर, विजय भंडारी, अशोक लोढा यांच्यासह जय आनंद ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे - 'आतापर्यंत मला अनेक पुरस्कार मिळाले आहेत; पण माझ्या समाजाने दिलेला "समाजभूषण' हा पुरस्कार माझ्या दृष्टीने पद्मश्रीपेक्षा मोठा आहे,'' अशी भावना उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते राजेश सांकला यांनी व्यक्त केली.

"जय आनंद ग्रुप'तर्फे सांकला यांना "समाजभूषण' पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या पत्नी रंजना यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी "जीतो अपेक्‍स'चे अध्यक्ष गणपतराज चौधरी होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल, पिंपरी-चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब भोईर, समाजाचे ज्येष्ठ नेते विजयकांत कोठारी, सकल संघ पुणेचे महामंत्री विजय भंडारी या वेळी उपस्थित होते.

गोडसे यांनी तीस वर्षांपासून राजेश सांकला यांच्याशी असलेला ऋणानुबंध मनोगतामध्ये व्यक्त केला. ते म्हणाले, 'तरुणांना लाजवणारा चिरतरुण कार्यकर्ता कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजेशजी.'' दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे शिल्पकार म्हणूनही गोडसे यांनी सांकला यांचा गौरव केला.

गोयल म्हणाले, 'जो आपल्या आईवडिलांची प्रतिष्ठा वाढवितो, त्याच्यावर समाजदेखील प्रेम करतो. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजेश सांकला.''

जैन समाजातील बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व टेलिकॉम विषयात देशात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या हिमाली अनिल बोथरा या विद्यार्थिनीचा या वेळी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अनिल लुंकड यांनी केले. आनंद कोठारी यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com