सामंत यांनी पुण्यात अफगाणी विद्यार्थ्यांना दिले 'हे' आश्वासन

अफगाणी विद्यार्थ्यांसाठी आठवडाभरात बैठक घेऊन, सर्वतोपरी मदत करण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिले आहे
Uday Samant
Uday SamantSakal media

पुणे : अफगाणिस्तानमधून आलेल्या विद्यार्थ्यांच्या (student) अडचणी राज्य सरकार (maharashtra govt) म्हणून आम्ही समजून घेतल्या आहेत. या संकटाच्या काळात आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. या समस्यांच्या निराकरणासाठी आम्ही आठवड्याभरात बैठक घेऊन निर्णय घेऊ, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी दिली.

Uday Samant
अँमेनिटी स्पेसच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी कडून निषेध

ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेत सामंत यांनी अफगाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी उच्च शिक्षण संचालक धनराज माने, एआयएसएसएमएसच मानद सचिव मालोजीराजे छत्रपती, सरहदचे अध्यक्ष संजय नहार, युवासेनेचे राज्य सहसचिव किरण साळी, अफगाणी विद्यार्थी प्रतिनिधी महमद अफगाणी आदी उपस्थित होते.

पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी लक्षात घेता सहानुभूतिपूर्वक विचार करून आवश्यक ती मदत केली जाईल. व्हिसा बाबत केंद्र सरकारच्या परवानगी बाबत चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन सामंत यांनी दिले.

अफगाणी विद्यार्थ्यांच्या अडचणी :

- ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये व्हिसा संपणार

- घरच्यांच्या नोकऱ्या गेल्यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या

- शिष्यवृत्तीचा कालावधी संपल्यामुळे अडचणींत वाढ

- शैक्षणिक शुल्क भरणे शक्य नाही

Uday Samant
"PMRDAच्या पायाभूत सुविधांचं महापालिकेकडं होणार हस्तांतरण"

‘त्या’ ५४१ विद्यार्थ्यांना भारतात आणणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत ५४१ अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांचे विविध महाविद्यालयात आणि अभ्यासक्रमांना प्रवेश झाले आहे. सध्या हे विद्यार्थी अफगाणिस्तानमध्ये असून अशा विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले.

अफगाणिस्तानातील अराजकतेमुळे आम्हाला आर्थिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आम्ही आमच्या देशातही परतू शकत नाही. व्हिसाच्या मुदतवाढीपासून शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक शुल्काबद्दलही समस्या आहेत. - रशिदा सरवरी, अफगाणी विद्यार्थिनी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून माझे शिक्षण पूर्ण झाले असून, आता मी पीएच.डी. करू इच्छितो. पण अफगाणिस्तानमध्ये मागील तीन महिन्यांपासून माझ्या कुटुबांला कोणतेच उत्पन्न नाही. त्यामुळे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठीही माझ्याकडे पैसे नाही. - जेबिउल्ला रहीम, अफगाणी विद्यार्थी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com