
लोकभावनेचा आदर करून संभाजी बिडीच्या नावात बदल करण्यात आला आहे. आता संभाजी बिडी ही साबळे बिडी या नावाने येत्या एक फेब्रुवारीपासून बाजारात येणार आहे, अशी माहिती साबळे-वाघिरे कंपनीचे संचालक संजय साबळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे - लोकभावनेचा आदर करून संभाजी बिडीच्या नावात बदल करण्यात आला आहे. आता संभाजी बिडी ही साबळे बिडी या नावाने येत्या एक फेब्रुवारीपासून बाजारात येणार आहे, अशी माहिती साबळे-वाघिरे कंपनीचे संचालक संजय साबळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
पुण्यात पुन्हा होणार एल्गार परिषद
संभाजी ब्रिगेडसह काही सामाजिक संघटनांनी महापुरुषांच्या नावावर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी घालण्यात यावी. तसेच, संभाजी बिडीचे नाव बदलण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर साबळे म्हणाले, 1932 पासून मुंबईत हा उद्योग-व्यवसाय सुरू झाला असून, त्यावर सध्या 60 ते 70 हजार कामगारांचा प्रपंच सुरू आहे. वडीलांचे पणजोबांचे नाव संभाजी असल्यामुळे उद्योगाला ते नाव दिले होते. संभाजी महाराज हे आमचे दैवत आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
संभाजी बिडीचे नाव बदलताना व्यवसायावर परिणाम झाल्यास रोजी-रोटीचे काय, असा प्रश्न कामगारांनी उपस्थित केला होता. परंतु कामगारांना अडचण येणार नाही, यासाठी आमचे प्रयत्न राहतील. कंपनीचे संचालक राहुल साबळे आणि निखिल साबळे या वेळी उपस्थित होते.
Edited By - Prashant Patil