संभाजी ब्रिगेड : दंगलमुक्त महाराष्ट्र हवा असेल, तर....

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

पुणेः यापुढील पिढीला योग्य इतिहास समजावा यासाठी बदल गरजेचा असून, दंगलमुक्त महाराष्ट्र व्हावा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटत असेल तर संभाजी उद्यानातून राम गणेश गडकरी यांचे तैलचित्र काढून संभाजी महाराजांचा पुतळा बसवावा, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने आज (सोमवार) येथे मांडली.

राम गणेश गडकरी पुतळ्याबाबत संभाजी ब्रिगेडची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषदचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी म्हणाले, 'आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. गडकरी यांनी त्यांच्या लिखाणातून संभाजी महाराजांची बदनामी केली आहे. संभाजी उद्यानात गडकरींचे सध्या जे तैलचित्र आहे ते काढून टाकण्यात यावे, याबाबतची मागणी आम्ही पुणे महापालिकेकडे वारंवार करत आहोत. परंतु, महापालिकेने प्रतिसाद दिला नाही. गडकरी यांच्या पुतळ्याबाबत ब्राह्मण ब्राह्मणेतर हा वाद मुळीच नाही. शासनाला आमची विनंती की ज्या साहित्यामधून संभाजी महाराजांची बदनामी झाली आहे ते गडकरी यांचे साहित्य नामशेष करावे. विचारांची लढाई विचारांनी व्हावी.'

'गडकरींच्या पुतळ्याचा आधार घेऊन संभाजी ब्रिगेडला राजकारण करायचे नाही. यापुढील पिढीला योग्य इतिहास समजावा यासाठी बदल गरजेचा आहे. जर पुढे जाऊन दंगलमुक्त महाराष्ट्र व्हावा, असे मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर संभाजी उद्यानातून गडकरी यांचे तैलचित्र काढून संभाजी महाराजांचा पुतळा बसवावा,' अशी मागणीही ब्रिगेडने केली.

'पुतळा पाडल्याचा एवढा गदारोळ करत असाल, तर बाबरी मशिद का पाडली?,' असा सवालही ब्रिगेडने उपस्थित केला.

Web Title: sambhaji brigade press conference about sambhaji maharaj