Sambhaji Brigade : संभाजी ब्रिगेडचे आज रौप्यमहोत्सवी अधिवेशन; शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती

संभाजी ब्रिगेडचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन आज आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन गणेश कला क्रीडा मंच येथे सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत होणार आहे.
Sambhaji Brigade
Sambhaji BrigadeSakal
Summary

संभाजी ब्रिगेडचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन आज आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन गणेश कला क्रीडा मंच येथे सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत होणार आहे.

पुणे - संभाजी ब्रिगेडचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन आज आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन गणेश कला क्रीडा मंच येथे सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत होणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या हस्ते अधिवेशनाचा समारोप केला जाणार आहे.

उद्घाटन समारंभाला खासदार श्रीनिवास पाटील, इंदूरचे श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर, तंजावरचे युवराज संभाजीराजे भोसले हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांना जीवनगौरव तर, प्रसिद्ध अभिनेते अशोक समर्थ व लेखक अरविंद जगताप यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. दिवसभराच्या या अधिवेशनात तीन सत्र होणार आहेत. यातील पहिले सत्र खासगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरणानंतरचा भारत आणि जग या विषयावर होणार आहे. या सत्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सकाळ माध्यम समूहाचे संपादक-संचालक श्रीराम पवार आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे सहभागी होणार आहेत.

दुसरे सत्र २१ वे शतक-स्टार्टअपचे युग या विषयावरील असून, यामध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, मिटकॉन फोरमचे संचालक गणेश खामगळ आणि युवक कॉग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे हे सहभागी होणार आहेत. तिसरे सत्र हे आरक्षणाकडून अर्थकारणाकडे या विषयावर होणार आहे. यामध्ये क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, बी.व्ही.जी. ग्रुपचे हणमंत गायकवाड, सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे आणि राजवर्धिणी जगताप आदी सहभागी होणार आहेत. समारोपप्रसंगी कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, प्रसिद्ध दिग्‍दर्शक नागराज मंजुळे आणि ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव उपस्थित राहणार आहेत. या समारंभात ज्येष्ठ विचारवंत प्रा. मा. म. देशमुख, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com