...तर महाराष्ट्रातील एक भाजप कार्यालय ठेवणार नाही : संभाजी ब्रिगेड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

दिल्लीतील भाजप कार्यालयात जयभगवान गोयल यांनी लिहिलेल्या 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाश करण्यात आले. यानंतर महाराष्ट्रभर याचा विरोध करण्यात येत आहे. या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी होऊच शकत नाही. 'आज के शिवाजी... नरेंद्र मोदी' हे पुस्तक खोटे आहे. शिवाजी महाराजांपेक्षा कोणीही मोठे नाही. हे वादग्रस्त पुस्तक आठ दिवसाच्या आत भाजपने मागे घ्यावे, अन्यथा महाराष्ट्रातील एकही भाजप कार्यालय ठेवणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीतील भाजप कार्यालयात जयभगवान गोयल यांनी लिहिलेल्या 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाश करण्यात आले. यानंतर महाराष्ट्रभर याचा विरोध करण्यात येत आहे. या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. संभाजी ब्रिगेडनेही आज (सोमवार) पुण्यातील लाल महाल येथे मावळ्यांच्या पगड्या घालून आंदोलन केले. पुढील 48 तासात पुस्तकावर जर कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्रात जो काही असून प्रश्न निर्माण होईल त्याला केंद्र सरकार जबाबदार असेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

भाजप नेते श्याम जाजू म्हणतात, शिवाजी महाराजांमध्ये असणारे गुण मोदींमध्ये...

संभाजी ब्रिगेडचे केंद्रिय निरीक्षक विकास पासलकर म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱ्या व्यक्तीबाबतचे चित्र नेमके त्यांच्या उलटे आहे. भाजप शिवाजी महाराजांसोबत नरेंद्र मोदी यांची तुलना करून 'काळा इतिहास पांढरा करण्याचा प्रयत्न करत आहेत.' श्याम जाजू महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. ते गद्दार निघतील असं वाटलं नव्हते. जाजू यांच्या डोळ्यासमोर शिवरायांशी तुला होत असताना ते मोदींच्या सत्तेपुढे इमान विकत बसले होते हे त्यातून स्पष्ट होते. शिवाजी महाराजांसोबत मोदी यांची तुलना होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोदींसह कोणीही मोठा नाही.

उद्धवजी, राऊताच्या जिभेला लगाम घाला; संभाजीराजेंकडून अरेतुरेची भाषा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Brigade warns to destroy every BJP office in Maharashtra