...म्हणून संभाजी ब्रिगेड उपराष्ट्रपतींना पाठविणार एक लाख पत्रं!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 July 2020

महाराष्ट्रात भाजपने शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून मतांची भीक मागितली आणि त्याच जोरावर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले.

पुणे : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणेला आक्षेप घेण्याचा घटनेचा राज्यभरातून निषेध केला जात आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडतर्फे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांना एक लाख पत्र पाठविण्यात येणार असल्याची माहिती ब्रिगेडचे नेते विकास पासलकर यांनी गुरुवारी (ता.२३) दिली.

जवानांना निरोप देताना 'त्यांच्या' अश्रूंचा बांध फुटला; रेल्वेमंत्र्यांनी शेअर केला भावनिक व्हिडिओ​

राज्यसभेत खासदार पदाची शपथ घेताना छत्रपती उदयनराजे भोसले यांनी 'जय भवानी, जय शिवाजी' अशी घोषणा दिली. त्याला कॉंग्रेसच्या काही सदस्यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर नायडू यांनी त्या घोषणा सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर ब्रिगडेचे नेते पासलकर, जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, सचिव महादेव मातेरे, गणेश चऱ्हाटे, विराज तावरे, विकास मोरे आदींनी एक लाख पत्र नायडू यांना पाठविण्याचा संकल्प जाहीर केला. 

पुणेकरांनो, तुम्ही विद्यापीठ चौकमार्गे प्रवास करता? वाहतुकीतील नवा बदल जाणून घ्या!​

या बाबत ब्रिगडेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ''छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कोणीही मोठं नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष असल्यामुळे त्यांचा दिल्लीच्या संसदेतही जयघोष झाला पाहिजे. महाराजांचा अपमान केल्यामुळे नायडू आणि इतर नेत्यांनी महाराष्ट्रासह देशाची माफी मागितली पाहिजे, अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे.

महाराष्ट्रात भाजपने शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून मतांची भीक मागितली आणि त्याच जोरावर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यामुळे छत्रपती किंवा त्यांच्या वंशजांचा अपमान ब्रिगेड खपवून घेणार नाही. संसदेचे सभागृह ज्यावर उभे आहे ती जागा सुभेदार मल्हारराव होळकर यांनी दान केलेली जमीन आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मराठा साम्राज्याचा वारसा जगाला प्रेरणा देणारा आहे. त्यामुळे दान केलेल्या जमिनीवरील सभागृहात छत्रपतींचा अपमान हा शिवद्रोह आहे. म्हणूनच एक लाख पत्र पाठविण्याचा निर्णय संभाजी ब्रिगडेने घेतला आहे, असे पासलकर यांनी म्हटले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Brigade will send one lakh letters to Vice President M Venkaiah Naidu