indapur
indapur

संभाजी काळे यांचा आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण मानेंच्या हस्ते सत्कार

इंदापूर : उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील महत्वपूर्ण असणाऱ्या अगोती क्र. दोन ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत सदस्य पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माधुरी 
संभाजी काळे यांची बिनविरोध निवड झाली. काळे यांना बिनविरोध निवडून आणणारे त्यांचे पती संभाजी काळे यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने यांच्या हस्ते इंदापूर येथे करण्यात आला.

यावेळी प्रविण माने म्हणाले, अगोती क्र. 2 हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असताना जिल्हा परिषद निवडणूकीत या गावात 100 मताधिक्य मला मिळाले. त्यानंतर या गावच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या सुरू असलेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार काळे यांनी विजयी सलामी दिली आहे.

पंचवार्षिक सदस्यमंडळाच्या निवडणूकीनंतर या ग्रामपंचायतीवर निश्चित राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी सोनाई कृषी कारखान्याचे संचालक मनोहर ढुके, सोनाई परिवाराचे संचालक अतुल माने, चांगदेव ढुके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com