आगामी निवडणुकीत १९७७ सारखेच घडेल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

पुणे - ‘‘देशात पक्ष नाही, सत्तेला नेतृत्व आणि पर्याय नाही, असे बोलले जाते. पण १९७७ मध्येही अशीच परिस्थिती होती. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केल्याने जनतेने विरोधी पक्ष नसतानाही त्यांना पराभूत केले. आज देशात त्यावेळसारखीच स्थिती आहे. त्यामुळे पुढे निवडणुकीतही तसेच घडेल,’’ असे सूतोवाच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले.

नारायण पेठेतील लोकमान्य सभागृहात झालेल्या ‘वी द चेंज : आम्ही भारताचे लोक’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. साहित्यिक यशवंत मनोहर, खासदार राजू शेट्टी, राजीव सातव, आमदार कपिल पाटील, शिक्षणतज्ज्ञ रझिया पटेल, पुस्तकाचे लेखक संजय आवटे आदी उपस्थित होते. 

आसाममधील ‘एनआरसी’च्या (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन) मुद्द्यावर पवार म्हणाले, ‘‘आमच्या सरकारनेदेखील बांगलादेशींना परत पाठविले; पण त्यांच्याच देशात. त्यासाठी तेथील सरकारबरोबर वाटाघाटी केल्या. आज ४० लाख लोकांचा प्रश्‍न आहे. बांगलादेशाने हे लोक आमचे नाहीत, असे म्हटले आहे. हे लोक जाणार कुठे? हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेला आणून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा.’’

मराठा समाजात अस्वस्थता आहे. त्यांना आरक्षण दिले पाहिजे. पण राज्य सरकारची भूमिका स्वच्छ नाही. त्यामुळे गावागावांतील वातावरण बिघडू लागले आहे. पण, सरकारला मागण्या पूर्ण करण्याशिवाय पर्याय नाही, असेही पवार म्हणाले. 

शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. ते म्हणाले, ‘‘भाजपबरोबर जाणे ही माझी चूक होती. पण, देशात आणीबाणीसारखी स्थिती आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्यांना सोडले.’’ 

Web Title: same will happen in the upcoming election 1977