उजवा मुठा कालवा भुयारी करण्यास मंजुरी - गिरीश महाजन

उजवा मुठा कालवा भुयारी करण्यास मंजुरी - गिरीश महाजन

पुणे -  उजवा मुठा कालवा भुयारी करण्याबाबतच्या प्रस्तावास नियामक आयोगाने मंजुरी दिली आहे. त्यावर ऑनलाइन प्रस्ताव मागविण्यात आले असून 10 ते 12 कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. लवकरच त्यास मान्यता देण्यात येईल, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी सांगितले. 

कालव्याची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी ही माहिती दिली. महाजन म्हणाले, ""सुमारे 35 किलोमीटर लांबीचा हा कालवा आहे. उघड्या कालव्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते, त्यामध्ये घाणही मोठ्या प्रमाणावर पडते. कालवा फुटीची शक्‍यता असते, हे सगळे पाहता कायमस्वरूपी हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी तो भुयारी कालवा करण्याचा विचार आहे. तसे केल्यास दोन ते अडीच टीएमसी पाण्याचीदेखील बचत होईल. कालव्याची जागाही वापरास मिळेल; परंतु त्यासाठी बाराशे ते तीन हजार कोटी रुपयांपर्यंतचा खर्चाचे प्रस्ताव कंपन्यांनी सादर केले आहे. यासाठी कोणी खर्च करावयाचा आणि किती करावयाचा, हा प्रश्‍न असून, त्यासंदर्भात पालकमंत्री गिरीश बापट यांना बरोबर घेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.'' 

कालवा दुरुस्तीवरून महापालिका आणि पाटबंधारे यांच्यातील वादावर विचारले असता, ते म्हणाले, ""कोणताही वाद नाही, पैशाचाही प्रश्‍न नाही. पुणे महापालिका आणि जिल्ह्यातील चार गावांना या कालव्यातून पाणीपुरवठा होतो. त्यामुळे तो दुरुस्तीसाठी बंद ठेवता येत नाही. पर्याय म्हणून महापालिकेकडून बंद पाइपलाइनचे काम सुरू आहे. ते एक ते दीड महिन्यात पूर्ण करावे, अशा सूचना महापालिकेला दिल्या आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर कालवा दुरुस्तीसाठी बंद करता येईल.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com