सांगलीच्या कुंडलमधील डॉ.जी.डी.बापू लाड साखर कारखाना राज्यात सर्वोत्कृष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगलीच्या कुंडलमधील डॉ.जी.डी.बापू लाड साखर कारखाना राज्यात सर्वोत्कृष्ट

सांगलीच्या कुंडलमधील डॉ.जी.डी.बापू लाड साखर कारखाना राज्यात सर्वोत्कृष्ट

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्यावतीने 202021 या वर्षासाठी दिला जाणारा "वसंततदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार' यंदा सांगली जिल्ह्याच्या पलुस तालुक्‍यातील कुंडल येथील क्रांतीअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे. त्यापाठोपाठ दौंडच्या दौंड शुगर प्रा.लि. कारखान्यास "विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजगता पुरस्कार', तर सांगलीच्या डॉ.पतंगराव कदम सोनहिरा कारखान्यास "डॉ.आप्पासाहेब ऊर्फ सा.रे.पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार' जाहीर झाला आहे. तर 2019-20 या वर्षासाठी सांगलीच्याच उदगिरी शुगर ऍन्ड पॉवर कारखान्यास "सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार' देण्यात आला आहे.

हेही वाचा: शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आतापर्यंत साडे सहा लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे (व्हिएसआय) उपाध्यक्ष व राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेमध्ये या पुरस्कारांची घोषणा केली. यावेळी संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, मुख्य कार्य अधिकारी संभाजी कडू उपस्थित होते. लाड सहकारी साखर कारखान्यास प्राप्त झालेल्या सर्वोत्कृष्ट कारखान्यासाठी दोन लाख 51 हजार रुपये रोख, मानचिन्ह, प्रशस्तीपत्र असा पुरस्कार देण्यात येणार आहे. मंगळवारी (ता.4) सकाळी साडे दहा वाजता संस्थेची 45 वी सर्वसाधारण सभा व पारितोषिक वितरण कार्यक्रम मांजरी येथे संस्थेच्या सभागृहात होईल. केंद्रीय कृषीमंत्री व संस्थेचे अध्यक्ष शरद पवार हे या कार्यक्रमासाठी ऑनलाईन माध्यमाद्वारे उपस्थित राहणार आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष व राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित राहणार आहेत.

पुरस्कार जाहीर झालेले कारखाने, शेतकरी, पदाधिकारी, तंत्रज्ञ पुढीलप्रमाणे :

 • वसंततदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार - क्रांतीअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखाना, कुंडल,पलुस,सांगली

 • विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार - दौंड शुगर प्रा.लि. आलेगाव, ता.दौंड

 • डॉ.आप्पासाहेब ऊर्फ सा.रे.पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार - डॉ.पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना, वांगी, कडेगाव, सांगली

 • कर्मयोजी शंकरराव पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार (2019-20) - उदगिरी शुगर ऍन्ड पॉवर लि.बामणी (पारे), खानापुर, सांगली

 • किसन महादेश ऊर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार - राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना, साखराळे, वाळवा, सांगली

 • रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवनी पुरस्कार - शरयु ऍग्रो इंडस्ट्रीज, कापशी (मोतेवाडी), फलटण, सातारा

हेही वाचा: शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आतापर्यंत साडे सहा लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

- उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार

दक्षिण विभाग - सह्याद्री सहकारी साखर कारखाना, कराड, सातारा, मध्यविभाग - द्वारकाधीश साखर कारखाना, शेवरी, सटाणा, नाशिक, उत्तरपुर्व विभाग - कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना युनीट 2, घनसांगवी, जालना.

- उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार

दक्षिण विभाग - जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना, हातकणंगले, मध्य विभाग - द्वारकाधीश साखर कारखाना, शेवरी, सटाणा, नाशिक, उत्तर पुर्व विभाग - नॅचरल शुगर ऍन्ड अलाईड इंडस्ट्रीज, रांजणी, कळंब, उस्मानाबाद.

राज्यस्तरीय ऊस भुषण पुरस्कार

 • विमल धोंडीराम पवार (वर्णे, सातारा)

 • विश्‍वनाथ धोंडीबा होळसंबरे (गुडसुर, उदगीर, लातुर)

 • सुलोचना मोहनराव कदम (कुंडलवाडी, वाळवा, सांगली)

* विभागवार ऊस भूषण पुरस्कार (ऊसाचे अधिकाधिक उत्पन्न काढणारे शेतकरी)

 • दक्षिण विभाग - 1- अशोक ताताबा जाधव (पुणदी, पलुस, सांगली) 2- विश्‍वास रामचंद्र शेडगे (अंगापुर, सातारा), 3- बळवंत मारुती पाटील (वाटेगाव, वाळवा, सांगली)

 • मध्य विभाग - 1 - गुलाब दशरथ काकुस्ते (कोकले, साक्री, धुळे), 2- आनंदराव नामदेव बोंद्रे (निमसाखर, इंदापुर,पुणे), 3- आबासाहेब तुळशीराम बोडके (पिंपरी, इंदापुर, पुणे)

 • उत्तरपुर्व विभाग - 1 - सुनील संग्राम कुंठे (आनंदवाडी, उदगीर, लातुर)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune News
loading image
go to top