सांगरुण होतंय "स्मार्ट ग्राम' 

राजेंद्रकृष्ण कापसे 
सोमवार, 30 जानेवारी 2017

खडकवासला : स्वच्छता अभियान, प्लॅस्टिक कचरामुक्ती, हागणदारीमुक्तीनंतर "बेटी बचाव अभियाना'तदेखील उत्तम कामगिरी करीत सांगरुण (ता. मुळशी) गाव "स्मार्ट व्हिलेज' बनले आहे. गावात मुलींचा जन्म दर 115 टक्के जास्त आहे. 

खडकवासला : स्वच्छता अभियान, प्लॅस्टिक कचरामुक्ती, हागणदारीमुक्तीनंतर "बेटी बचाव अभियाना'तदेखील उत्तम कामगिरी करीत सांगरुण (ता. मुळशी) गाव "स्मार्ट व्हिलेज' बनले आहे. गावात मुलींचा जन्म दर 115 टक्के जास्त आहे. 

पुण्यापासून 25 किलो मीटरवर असलेले हे गाव. "स्मार्ट व्हिलेज' संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी गावातील लोकांनी वज्रमूठ बांधली आहे. गावात "सकाळ'ने राबविलेल्या "मुठा परिक्रमा' कार्यक्रमाच्या निमित्ताने मुठा नदीबरोबर गावही स्वच्छ ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला होता. "सकाळ'चा हा उपक्रम ग्रामस्थांना दिशादर्शक ठरला. 
26 जानेवारी 2016 रोजी झालेल्या ग्रामसभेच्या आकडेवारीनुसार गावात फक्त 40 टक्के स्वच्छतागृहे होती. केंद्र सरकारच्या "स्वच्छता अभियाना'त सहभागी होत गावाने अवघ्या सात महिन्यांत संपूर्ण गाव हागणदारीमुक्त केला. गावातील प्रत्येक घरात स्वच्छतागृह बांधले गेले. 
गावात ठिकठिकाणी कचरा आणि प्लॅस्टिक पडलेले असायचे. त्यामुळे अवकळा आल्याप्रमाणे गावाची अवस्था झाली होती. "स्वच्छता अभियाना'त 2 ऑक्‍टोबर 2016 रोजी गाव प्लॅस्टिकमुक्त करण्याचा ठराव झाला. प्लॅस्टिक बंदीबाबत विनोद बोधनकर यांनी माहिती दिली. दर रविवारी गावात सामूहिक स्वच्छता अभियान राबविले जात आहे. प्रत्येक कुटुंब या उपक्रमात सहभागी होत होते. दोन महिन्यांत एकूण 250 किलो प्लॅस्टिक जमा झाले. 

गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्यामुळे गावात आरोग्याबाबत नागरिक योग्य पद्धतीने काळजी घेतात. यामुळे मुलींचा जन्म दर वाढण्यासाठी ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, आंगणवाडीचे सहकार्य मिळाले. 
सीताबाई मानकर, सरपंच 

गावात 2016 मध्ये जन्मलेल्या मुलींची संख्या 38 (मुलांपेक्षा 15 मुली जास्त) आहे. मुलींचा जन्मदर वाढल्याने ही संख्या कायम राहावी, म्हणून मुलींच्या स्वागतासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने महिला बाल कल्याणच्या योजनेअंतर्गत मुलीच्या नावे तीन हजार रुपयांची पोस्टात बचत ठेव ठेवण्याचा ठराव केला होता. त्या मुलीचे 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर व्याजातून जमा होणारी रक्कम तिला मिळणार आहे. 
अभय निकम, ग्रामसेवक 

सांगरुण गाव दृष्टिक्षेपात 

एकूण स्त्री : 623 
एकूण पुरुष : 622 
एकूण लोकसंख्या : 1245 

गावातील घरे : 204 
स्वच्छतागृहे असलेली घरे : 204 

जनधनची खाती : 263 
सुकन्या योजना खाती :  23 
रोजगार हमीचे जॉब कार्ड : 52 

Web Title: sangrun smart village