व्हेंडिंग मशिनद्वारे सॅनिटरी नॅपकिन्स

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

वायसीएम रुग्णालयासह शहरात चार ठिकाणी सोय
पिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिका आणि ऍक्‍शन कमिटी अगेन्स्ट अनफेअर मेडिकल प्रॅक्‍टिस या संस्थेच्या वतीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे बसविलेल्या सॅनिटरी नॅपकिन्स व्हेंडिंग आणि डिस्पोजल मशिनचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. 6) महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते झाले.

सह आयुक्त दिलीप गावडे, वैद्यकीय अधीक्षक मनोज देशमुख, सहायक आरोग्याधिकारी गणेश देशपांडे, आरोग्य निरीक्षक सलीम इनामदार, मुख्य आरोग्य निरीक्षक आर. एम. भोसले, पी. आर. तावरे, मोनिका चव्हाण, रोहिणी गोडसे, ललिता जाधव, माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी, ऍक्‍शन कमिटी अगेन्स्ट अनफेअर मेडिकल प्रॅक्‍टिसचे अध्यक्ष राजेंद्रकुमार धेंडे, विक्रम भोसले, एकता भोसले, वीरेंद्र सिंग पाटील उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, शिवाजी विद्यालय भोसरी, साई शारदा महिला औद्योगिक प्रशिक्षण केंद्र कासारवाडी, मोरया गोसावी सार्वजनिक स्वच्छतागृह येथे ही मशिन बसविली आहेत. त्यापैकी यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील मशिनचे उद्‌घाटन झाले. मशिनमध्ये पाच रुपयाचे नाणे टाकल्यानंतर सॅनिटरी नॅपकिन्स मिळणार आहेत. तसेच, वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स डिस्ट्रॉयर मशिनमध्ये टाकल्यानंतर शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट होऊन त्याची राख होणार आहे. हा नावीन्यपूर्ण उपक्रम शहरात प्रथमच प्रायोगिक तत्त्वावर राबविला आहे. त्यासाठी महापालिकेची आर्थिक गुंतवणूक नसून केवळ जागा व विजेची सोय करून दिली आहे.

Web Title: sanitary napkins by vending machine