जुन्नरला रॅलीतून स्वच्छता जनजागृती

दत्ता म्हसकर
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

जुन्नर - 'स्वच्छता असेल जेथे, आरोग्य वसेल तेथे', 'एक दोन तीन चार, स्वच्छतेचा जयजयकार', 'ओला सुका कचरा वेगळा करू, स्वच्छ सुंदर परिसर निर्माण करु' अशा स्वच्छतेच्या घोषणा देत जुन्नर शहरातील रहदारीच्या ठिकाणी रॅलीतून स्वच्छता जनजागृती करण्यात आली. 

१ ते १५ ऑगस्ट स्वच्छ व स्वस्थ भारत पंधरवाड्याचे आयोजन श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आले. यात विद्यार्थांनी स्वच्छतेची शपथ घेतली. महाविद्यालयाच्या परिसराची स्वच्छता व वर्गखोल्यांची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छतेची जनजागृती करण्यासाठी जुन्नर शहरातील नवीन एस टी स्टँड, कृषी उत्पन्न बाजार समिती, धान्य बाजार, परदेशपुरा मार्गे बोडके नगर अशी रॅली काढून स्वच्छतेचे संदेश देण्यात आले. रॅलीमध्ये ८० विद्यार्थी सहभागी झाले होते. जुन्नर नगर परिषदेचे सहकार्य लाभले. रॅलीचे नियोजन कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष गवळी यांनी केले. प्रा. राहूल सहाने, प्रा. आबाजी सूर्यवंशी, प्रा. रेखा गायकवाड उपस्थित होते. प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष अॅड . संजय काळे यांनी शुभेच्छा दिल्या

Web Title: Sanitation Publicity from Junnar Rally