सॅनिटायझरच्या दरात झाली ५० टक्‍क्‍यांनी घट

Sanitizer
Sanitizer

पुणे - ‘कोरोनाच्या भीतीपोटी सुरवातीला हात, मोबाईल, चावी अशा वस्तू निर्जंतूक करण्यासाठी हॅंड सॅनिटायझरचा वापर करीत होतो. परंतु सध्या घरी असल्यावर साबण आणि हॅंड वॉशचा वापर करतो. इतर वस्तू निर्जंतूक करण्यासाठी बाजारात इतरही केमिकल्स उपलब्ध आहेत. त्यामुळे सॅनिटायझर अनिवार्य असले तरी वापर कमी झाला आहे. सॅनिटायझरचे दरही सध्या निम्म्यावर आले आहेत,’’ आयटी अभियंता गणेश खोटाले ‘सकाळ’शी बोलत होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाल्यानंतर सॅनिटायझरच्या किंमती अव्वाच्या सव्वा होत्या. काही उत्पादकांनी जूनपर्यंत सॅनिटायझरची मनमानी दराने विक्री केली. नोंदणीकृत नसलेल्या ब्रॅंडकडून निकृष्ट दर्जाचे सॅनिटायझरही चढ्या दराने विकण्यात येत होते. परंतु सध्या शेकडो सॅनिटायझर उत्पादक बाजारात उतरले आहेत. शिवाय, साखर कारखान्यांनी सॅनिटायझर उत्पादन सुरू केल्यानंतर आवकही वाढली आहे. अन्न व औषध प्रशासनाने त्याचे एमआरपी दर निश्‍चित केले. परिणामी सॅनिटायझरच्या दरात ५० टक्‍क्‍यांनी घट झाली आहे.

कारखानास्तरावरील सॅनिटायझरचे दर
पाच लिटर : २५०० रुपये
एक लिटर : ५०० रुपये
अर्धा लिटर : २५० रुपये

सध्या सॅनिटायझरचे उत्पादन घेतले जात असून, खपही बऱ्यापैकी आहे. सॅनिटायझरची बाजारात विक्री केली जात आहे. परंतु बहुतांश सॅनिटायझर कारखान्यांच्या सभासदांना विक्री केले जात आहे.
- विजय वाबळे, व्यवस्थापकीय संचालक, माळेगाव साखर कारखाना

सॅनिटायझरचे सुमारे पाच हजार ब्रॅंड बाजारात आहेत. साखर कारखान्यांनी सॅनिटायझरचे उत्पादन सुरू केल्यानंतर त्याचे दरही निम्म्यावर आले आहेत. तसेच, सॅनिटायझरच्या विक्रीतही काही प्रमाणात घट झाली आहे. नागरिकांकडून रोग प्रतिकारक्षमता वाढविण्याकडे अधिक लक्ष दिले जात आहे. 
- प्रशांत शिंदे, विक्री प्रतिनिधी

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com