पुणे : आंबेगाव सभापतिपदी संजय गवारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

- उपसभापतिपदी संतोष भोर यांची बिनविरोध निवड

घोडेगाव : आंबेगाव पंचायत समितीच्या सभापतिपदी संजय गवारी यांची तर उपसभापतिपदी संतोष भोर यांची बिनविरोध निवड झाली. आजच्या सभेला शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले गैरहजर होते. त्यातच उपसभापतिपदाच्या निवडणुकीतून शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखेले यांनी माघार घेतल्याने ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देणारी ठरली.         

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सभापतिपद अनुसूचित जमाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव होते. या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संजय गवारी यांनी तर उपसभापतिपदासाठी संतोष भोर यांनी अर्ज भरला. शिवसेना पक्षातर्फे राजाराम बाणखेले यांनी अर्ज भरला. शिवसेनेचे चार सदस्य आहेत. तर राष्ट्रवादीचे सहा सदस्य आहेत. शिवसेनेचे एक सदस्य रविंद्र करंजखेले गैरहजर असल्याने राजाराम बाणखेले यांनीही अर्ज माघारी घेतला.     

निवडीनंतर सभापती संजय गवारी यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते, उपसभापतिचा सत्कार भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांच्या हस्ते करण्यात आला.

शरद पवार अजित पवारांना म्हणाले, संधीचं सोनं करा

यावेळी शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, तालुका अध्यक्ष विष्णु हिंगे, माजी सभापती उषा कामडे, माजी उपसभापती नंदकुमार सोनावले, माजी सभापती कैलासबुवा काळे, जयसिंगराव काळे, सचिन भोर, प्रकाश घोलप, बाळासाहेब बाणखेले, दत्ता थोरात उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी नीता शिंदे यांनी काम पाहिले.

संजय गवारी यांना सभापतिपदाची संधी 

राज्याचे कॅबिनेटमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पुन्हा एकदा संजय गवारी यांच्यावर विश्वास ठेवून सभापतिपदाची संधी दिली आहे. मागील पंचायत समितीच्या काळात गवारी हे उपसभापतिपदी होते. वळसे-पाटील यांनी तरूण चेहऱ्याला संधी दिली आहे. कार्यकर्त्यांनी सभागृहात वळसे-पाटील व शरद पवार यांच्या विजयाच्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Gawari elected as chairman of Ambegaon Panchayat Committee