Pune : पणदरे गावचे संजय जगताप ठरले काळ्या मातीतले महानायक; एकरी १३७ टन घेतले उसाचे उत्पादन

यंदा सुरू झालेल्या ऊस गाळप हंगामातही ही ऊस उत्पादनाची स्पर्धा चालू आहे
sanjay jagtap pandare village grate farmer sugarcane production took 137 tons per acre
sanjay jagtap pandare village grate farmer sugarcane production took 137 tons per acreSakal

माळेगाव : माळेगाव कारखाना कार्यक्षेत्रात काही प्रयोगशिल ऊस उत्पादक शेतकरी एकरी ऊसाचे शंभर टन उत्पादन काढण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करतात. यंदा सुरू झालेल्या ऊस गाळप हंगामातही ही ऊस उत्पादनाची स्पर्धा चालू आहे. 

माळेगावचे सभासद आणि पणदरे-सोनकसवाडीचे शेतकरी संजय यशवंत जगताप यांनी चालू  हगामामध्ये एकरी १३७ टनाचे उत्पन्न घेतले व त्यांनी याआगोदरचे शंभर टनाचे रेकाॅर्ड मोडले, अशी माहिती आज कारखान्याच्या ऊस विकास विभागाने  स्पष्ट केली.

परिणामी काळ्या मातीतले महानायक म्हणून संजय जगताप यांची नव्याने ओळख निर्माण झाल्याचे अनेकांनी बालून दाखविले. जगताप यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतूक होत आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू झाला आहे.

दुष्काळी स्थितीमुळे यंदाच्या हंगामात उसाची मोठी टंचाई आहे. हे जरी खरे असले, तरी अनेक प्रयोगशिल शेतकरी यंदाही एकरी उसाचे शंभर टन उत्पादन काढण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करताना अढळून येतात.

या स्पर्धेत शिरपेचा तुरा लावणारी कामगिरी पणदरे-सोनकसवाडी (ता.बारामती) येथील शेतकरी संजय यशवंत जगताप यांनी केली आहे. जगताप यांनी को. ८६०३२ जातीच्या उसाचे उत्पन्न एकरी १३७ टन ६०० किलो इतके घेतले आहे.

२ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत जगताप यांच्या गट क्रमांक ३१९ मधील शिवारातील उसाची तोड गाळपासाठी करण्यात आली. त्यामध्ये जगताप यांनी ऊस उत्पादन वाढीचा केलेला विक्रम ऊस विकास विभागाने गुरूवारी पुढे आणला.

हा विक्रम इतर ऊस उत्पादकांसाठी दिशादर्शक ठरणारा असल्याचे अधिकारी सुरेश काळे यांनी सांगितला. विशेषतः या लक्षवेधी कामगिरीचे पडसाद गुरूवारी माळेगावच्या कार्यक्षेत्रात पडले आणि जगताप यांच्यावर अनेकांनी कौतूकाचा वर्षाव केला. 

त्यामध्ये संचालक मंडळही मागे राहिले नाही. अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, उपाध्यक्ष तानाजी देवकाते, संचालक योगेश जगताप, कार्य़कारी संचालक अशोकराव पाटील,  ऊस विकास आधिकारी सुरेश काळे आदींनी संबंधित प्रयोगशिल शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. 

शेती बरोबरच मेंदूचीही मशागत करत गेलो. नवनविन गोष्टी शिवारात राबविल्या आणि एकरामध्ये  १३७ टनाचे उद्दिष्ठ्य पुर्ण केले, अशी प्रतिक्रिया संजय जगताप यांनी दिली.  ते म्हणाले,``शेती क्षेत्रात सतत नकारात्मकता भरलेली असते.

अर्थात त्याला काही बाबींमुळे किनारही आहे. त्याकडे फारसे लक्ष न देता संशोधनात्मक झालेले काम शिवारत राबविल्यास एकरी शंभर नव्हे तर दीडशे टनापर्यंत ऊस उत्पादन घेता येईल. यंदा १३७ टन ऊस उत्पादन घेतल्याने एक प्रकारची संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे या यशस्वी  प्रयोगाविषयी शेतकरी बांधवांना  बरचकाही योग्यवेळी सांगणार आहे, ``असे त्यांनी सांगितले.

माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात शाश्वत ऊस उत्पादनासाठी एकरी १३७ टन ऊस उत्पादन घेणारे पणदरे-सोनकसवाडीचे संजय जगताप दिशादर्शक ठरले आहेत. त्यांची खऱ्याअर्थाने काळ्या मातीतले महानायक म्हणून बारामतीत नवी ओळख झाल्याचे आम्हालाही समाधान आहे. माळेगावच्या प्रशासनाच्यावतीने त्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया संचालक योगेश जगताप यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com