'अजित पवार काढू शकतात वेगळा पक्ष, त्यांचा चांगला संपर्क'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 September 2019

अजित पवार राज्यातील मोठे नेते असून, त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे ते दुसरा पक्ष काढू शकतात... 

पुणे : अजित पवार हे शरद पवार यांच्यापासून दूर जाणं शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस यांना कधीही परवडणार नाही. अजित पवार राज्यातील मोठे नेते असून, त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे ते दुसरा पक्ष काढू शकतात, असा अंदाज भाजप नेते संजय काकडे यांनी वर्तविला आहे. 

अजित पवार राजीनाम्यावर ठाम; मनधरणी सुरु

अजित पवार यांनी शुक्रवारी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अजित पवार राजीनामा दिल्यापासून कोणाच्या संपर्कात नाहीत. विविध राजकीय नेत्यांकडून त्यांच्या राजीनाम्याविषयी तर्क-वितर्क वर्तविण्यात येत आहेत. 

अजित पवारांसोबत फक्त सुनिल तटकरे; शिष्टाईचे जोरदार प्रयत्न 

याविषयी बोलताना संजय काकडे म्हणाले, की ईडीने निवडणुकीच्यावेळी शिखर बँकेवर गुन्हा दाखल यात सरकारचा काहीही संबंध नाही. यामध्ये शरद पवार सहानुभूती मिळवण्यासाठी हे सर्व करत आहेत. अजित पवार यांच्या एकट्यावर गुन्हा दाखल नाही, इतर लोकही यामध्ये सहभागी आहेत. यामुळे अजित पवार यांच्या राजनाम्याचे कारण वेगळे आहे. अजित पवार राज्यातील मोठे नेते असून, त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे ते दुसरा पक्ष काढू शकतात.

कौटुंबिक वादावर बोलणार नाही : गिरीश बापट
अजित पवारांच्या राजनाम्यामागे पक्षाअंतर्गत नेतृत्व त्याबद्दलचे वाद हे असू शकते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही तरी गडबड आहे हे यातून दिसत आहे. कौटुंबिक वादावर बोलणार नाही, असे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay kakade says ajit pawar possibility to establish new party