Loksabha 2019 : संजय काकडेंनी घेतली सिंहगड रस्त्यावरील नगरसेवकांची बैठक

Sanjay_kakde
Sanjay_kakde

पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवायची का, याचा विचारविनिमय करण्यासाठी संजय काकडे यांनी सिंहगड रस्ता परिसरातील आठ-दहा नगरसेवकांची मंगळवारी रात्री बैठक घेतली. 

या बैठकीला काही प्रमुख कार्यकर्ते देखील उपस्थित होते. भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवायची झाल्यास त्याची तयारी काय करावी लागेल, खडकवासला विधानसभा मतदारसंघातून किती मतदान होऊ शकेल, याबाबतचा विचार विनिमय या बैठकीत झाल्याचे समजते. 

मात्र याबाबतचा अंतिम निर्णय आज दिवसभरात घेऊन मुख्यमंत्र्यांना कळविले जाईल, असे संजय काकडे यांच्या निकटवर्तीयांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com