संजय राऊतांचे 'मिशन पुणे महापालिका'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 December 2019

राऊत म्हणाले, "पुण्यात संघटना मजबूत असली तरी, ती लोकांपर्यंत पोचली पाहिजे. ज्यामुळे विरोधकांच्या कारभारावर वचक राहणार आहे. ही ताकद निर्माण करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने तेवढ्या ताकदीने काम केले पाहिजे. पुढच्या दोन वर्षांत होणाऱ्या महापालिकेच्या सर्वाधिक 50 नगरसेवक शिवसेनेचे असतील, या दृष्टीने काम करा. या निवडणुकांत कोण-कोणासोबत असेल, यापेक्षा आपण स्वत: कसे लढू, यावर भर द्या.'' 

पुणे : ''पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेचे 50 नगरसेवक निवडून आणायचे आहेत. त्यासाठी जोरात तयारी करा आणि महापालिकेतील सत्तेतूनही भारतीय जनता पक्षाला हटवा, अशा शब्दांत नगरसेवक-पदाधिकाऱ्यांना आदेश देत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 'मिशन पुणे महापालिका' हा नवा कार्यक्रम शनिवारी जाहीर केला. 

काँग्रेससोबत सूर जुळण्यात 'या' गांधींचा मोठा वाटा: संजय राऊत

वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त पुण्यात आलेल्या राऊत यांनी शिवसेना भवनात पक्षाचे नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाळा कदम, शहरप्रमुख संजय मोरे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार उपस्थित होते. तेव्हा संघटनात्मक बांधणीचा आढावा घेत, महापालिकेतील शिवसेनेची कामगिरी आणि भाजपची धोरणे या मुद्दयांवर राऊत यांनी नगरसेवकांशी चर्चा केली. प्रभागरचनेतील बदलांच्या पार्श्‍वभूमीवर नवी राजकीय गणिते मांडताना शिवसेनेची ताकद वाढविण्याचा संदेश दिला. 

सुर्यग्रहण पाहायचंय? मग, ही घ्या काळजी

राऊत म्हणाले, "पुण्यात संघटना मजबूत असली तरी, ती लोकांपर्यंत पोचली पाहिजे. ज्यामुळे विरोधकांच्या कारभारावर वचक राहणार आहे. ही ताकद निर्माण करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने तेवढ्या ताकदीने काम केले पाहिजे. पुढच्या दोन वर्षांत होणाऱ्या महापालिकेच्या सर्वाधिक 50 नगरसेवक शिवसेनेचे असतील, या दृष्टीने काम करा. या निवडणुकांत कोण-कोणासोबत असेल, यापेक्षा आपण स्वत: कसे लढू, यावर भर द्या.'' 

Video : नाताळ निमित्त विकएंडला बाहेर पडलेले पुणेकर अडकले कोंडीत

पुणे शहर शिवसेनेतील गटबाजी उफाळून येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर राऊत काय भूमिका घेणार आणि गटबाजी करणाऱ्या कशी समज देतील, याकडे लक्ष होते. आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी राऊत यांची शिवसेना भवनात वैयक्तिक भेट घेतली. मात्र, पक्षातर्गंत राजकारणावर राऊत काहीच बोलले नाहीत. त्यामुळे शिवसेनेत सारे काही आलबेल असल्याचे स्पष्ट झाले. 
 
आमची 40 दिवसांची मोहिम यशस्वी झाली : संजय राऊत

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Raut Mission Pune Municipal Corporation