संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका; म्हणाले राज्यपालांना भेटणे हा महाराष्ट्राचा अपमान

sanjay raut on raj thackerey over meeting with governor bhagatsingh koshyari
sanjay raut on raj thackerey over meeting with governor bhagatsingh koshyari

पुणे : राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली होती. वीजबिले वाढीव दराने येत असल्याची तक्रार गेल्या काही दिवसांपासून होत आहे. हाच प्रश्न घेऊन राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. या भेटीवर आता शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टीकात्मक भाष्य केलं आहे. 

संजय राऊत यांनी म्हटलंय की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. ते राज्याचे प्रमुख असताना राज ठाकरेंनी राज्यपालांना जाऊन भेटणं योग्य नाही. महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन मुख्यमंत्र्यांऐवजी राज्यपालांना भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. याप्रकारची टीका संजय राऊत यांनी केली आहे. मात्र,  ही टीका करताना त्यांनी राज ठाकरे यांचा नामोल्लेख टाळला आहे. 

संजय राऊत यांची आज शनिवारी पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं आहे. कंगना राणावतच्या प्रकरणावरही त्यांनी सडेतोड भाष्य केलं. त्यांनी म्हटलंय की, कंगनावर धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी तिला समन्स बजावले होते मात्र आपल्या भावाच्या लग्नाचे कारण पुढे करत तिने चौकशीसाठी उपस्थित राहू शकणार नसल्याचं सांगितलं होतं. यावरुन संजय राऊत यांनी तिच्यावर टीका केली आहे. मला ती आधी शूर मुलगी वाटत होती मात्र, आता पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर तिने पोलिसांसमोर हजर रहायला हवं, असं राऊतांनी म्हटलं आहे. 

हे सरकार व्यवस्थितरित्या पाच वर्ष टिकणार आहे. येत्या काही दिवसांत या सरकारला एक वर्ष पूर्ण होणार आहे. हे सरकार अस्तित्वात येईल असं मला निवडणुकीच्या आधापासूनच वाटत होते, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. ठाकरे सरकार कोसळेल, यासाठी पैजा लागल्या होत्या मात्र हे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com