Corona Virus : देशात प्रथमच पोलिसांसाठी संजीवनी मोबाईल वाहनाचा प्रयोग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

संजीवनी वाहनाचा अशा पद्धतीचा अभिनव प्रयोग केला जात असून भारतातील ही एकमेव सुविधा असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. दिवसभर राबणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा उपक्रम राबविला गेला आहे. ही सुविधा रोंधे एंटरप्रायजेस या कंपनीच्या दीपक रोंधे यांच्या मदतीने कार्यान्वित करण्यात आली आहे.

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्तालयाने बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनापासून काही प्रमाणत बचाव करण्यासाठी "मोबाईल मिस्टिंग सॅनिटायझेशन वाहन" ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशामध्ये प्रथमच अशा पद्धतीने पोलिसांसाठी वेगळा उपक्रम राबविण्यात येत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 
अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या संकल्पनेतून उपलब्ध "मोबाईल मिस्टिंग सॅनिटायझेशन वाहन" ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. याविषयी वाहतूक शाखेचे (नियोजन) वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली. पाटील म्हणाले, " पोलिस थेट नागरिकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये, यादृष्टीने ही व्यवस्था करण्यात आली आहे. ही सुविधा ही बसविण्यासाठी पुणे पोलीस मोटर परिवहन विभागामधील वाहनाचा उपयोग करण्यात आला आहे."

पुणेकरांनो चिंता करू नका; शहराला पुरेल इतका भाजीपाला उपलब्ध

संजीवनी वाहनाचा अशा पद्धतीचा अभिनव प्रयोग केला जात असून भारतातील ही एकमेव सुविधा असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. दिवसभर राबणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा उपक्रम राबविला गेला आहे. ही सुविधा रोंधे एंटरप्रायजेस या कंपनीच्या दीपक रोंधे यांच्या मदतीने कार्यान्वित करण्यात आली आहे.

पुणे परिसरात १० टक्के विजेच्या मागणीत घट; पंतप्रधानांच्या आवाहनाचा परिणाम​

अशी असेल 'मोबाईल मिस्टिंग सॅनिटायझेशन वाहनसुविधा !

मोबाईल मिस्टिंग सॅनिटायझेशन वाहनाचे नामकरण संजीवनी असे करण्यात आले आहे. या गाडीमध्ये प्रेशर फॉगिंग सिस्टीम वापरण्यात आली आहे. सदर गाडीमध्ये कर्मचारीते 7 सेकंदांसाठी उभे राहिल्यास निर्जंतुकीकरण होऊन त्याचा परिणाम काही तासांसाठी राहतो. ह्या वाहनाद्वारे कर्तव्यास ज्या ठिकाणी पोलीस कर्मचारी कामास असतील त्या ठिकाणी जाऊन ही सुविधा देण्यास मदत होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjeevani Mobile Vehicle Experiment in the Country Against Corona