

पिंपरी, ता.१४ : प्राधिकरण परिसरातील सर्वाधिक वर्दळीच्या संत ज्ञानेश्वर उद्यानामध्ये पहाटे चारच्या सुमारास ३५ वर्षांहून अधिक जुन्या पिचकारी जातीच्या झाडाची मोठी फांदी दुभंगून पदपथावर कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने घटना पहाटे घडल्याने जीवितहानी टळली.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित झाडाची काही दिवसांपूर्वी अशास्त्रीय पद्धतीने छाटणी करण्यात आली होती. त्यामुळे झाडाचा समतोल बिघडून एका बाजूला वजन वाढल्याने फांदी दुभंगून कोसळली. पावसाच्या सुरुवातीलाच अशा प्रकारच्या चुकीच्या वृक्षछाटणीमुळे अनेक झाडांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याची चिंता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
CWD26A03271, CWD26A03272
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.