खड्डे असो वा घाट, चालू पंढरीची वाट

दोन वर्षांनंतर होणाऱ्या आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची तयारी सुरू आहे.
Sant Tukaram Maharaj Palkhi Route
Sant Tukaram Maharaj Palkhi RouteSakal
Summary

दोन वर्षांनंतर होणाऱ्या आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची तयारी सुरू आहे.

पुणे - दोन वर्षांनंतर होणाऱ्या आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची तयारी सुरू आहे. पालखी महामार्गावरील देहूरोड ते पाटसपर्यंतची वाटचाल महामार्गानेच होते. त्यानंतरचा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा पाटस ते वाखरी या मार्गावर रस्ता रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. त्यामुळे वारकऱ्यांना यंदा काही प्रमाणात कसरत करावी लागणार आहे. यंदा देहू संस्थानने वारकऱ्यांच्या सोयीसाठी उरुळी कांचन, भांडगाव आणि बऱ्हाणपूर येथील दुपारचे विसावे मुख्य रस्त्यावर घेतले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांचा वेळ वाचेल. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे २० जून रोजी देहूतून प्रस्थान होणार आहे. देवस्थानच्या वतीने तयारी सुरू आहे. रस्ता रुंदीकरणामुळे वारकऱ्यांना यंदा काहीसा अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पुढील वर्षी राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

देहू ते आकुर्डी

  • देहू ते देहूरोड या मार्गाचे रुंदीकरण आवश्यक

  • स्वागत करणाऱ्या मंडळांचे नियोजन व्हावे

  • देहू ते निगडी रस्त्यावर टॅंकरची व्यवस्था व्हावी

आकुर्डी ते पुणे

  • चिंचवड स्टेशन, एच.ए मैदान, वल्लभनगर, कासारवाडी, दापोडी, बोपोडीत स्वच्छतागृहे उभारावीत

  • पुणे-मुंबई महामार्ग पुरेसा रुंद

  • शहरातील सेवाभावी संस्था-संघटना, मंडळांचे नियोजन व्हावे

पुणे ते लोणी काळभोर

  • हडपसर गाडीतळावरील विसाव्याची व्यवस्था

  • उरळी कांचनचा विसावा मुख्य मार्गावर

  • वाहतूक नियमन व्हावे

लोणी काळभोर ते यवत

  • महामार्ग प्रशस्त असल्याने वाहतूक नियमन व्हावे

  • महामार्गावर टॅंकरची व्यवस्था करण्याची गरज

यवत ते वरवंड

  • महामार्ग प्रशस्त असल्याने वाहतूक नियमन व्हावे

  • महामार्गावर टॅंकरची व्यवस्था करण्याची गरज

वरवंड ते उंडवडी

  • रोटी घाटात रस्ता रुंदीकरण गरजेचे

  • पाटस ते उंडवडी रस्त्याचे रुंदीकरण सुरू

  • रुंदीकरणात किमान एकेरी डांबरी मार्ग उपलब्ध व्हावा

उंडवडी ते बारामती

  • बारामती रस्ता रुंदीकरण सुरू

  • बऱ्हाणपूरचा विसावा मुख्य रस्त्यावर

बारामती ते सणसर

  • रस्त्याचे काम होणे गरजेचे

  • काटेवाडीजवळच्या कॅनॉलला बॅरिकेडिंग गरेजेचे

सणसर ते आंथुर्णे

  • तळावर वृक्षारोपण करणे गरजेचे

  • तळावर पाण्याची व्यवस्था कायमस्वरूपी व्हावी

  • बेलवंडीजवळील रिंगणाच्या भागातील अतिक्रमणे हटवावीत

आंथुर्णे ते निमगाव केतकी

  • रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू

  • निमगाव केतकी तळाची जागा वाढण्याची गरज

निमगाव केतकी ते इंदापूर

  • गोकुळीचा ओढा येथे घेणार विसावा

  • रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू

  • इंदापूरचा तळ आयटीआयमध्ये

इंदापूर ते सराटी

  • सुरवड ते बावडा रस्ता रुंदीकरण व्हावे

  • सराटीला पाण्याची व्यवस्था व्हावी

सराटी ते अकलूज

  • पाऊस झाल्यास शेतात ट्रक फसण्याची शक्यता

  • साइडपट्ट्या भरणे गरजेचे

अकलूज ते बोरगाव

  • राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू

  • रिंगणाजवळ रस्ता चांगला करावा

  • पंचवीस फाटा ते बोरगाव रस्ता एकेरी डांबरी करावा

बोरगाव ते पिराची कुरोली

  • तोंडले-बोंडलेत स्वतंत्र स्वागत कमान उभारावी

  • धाव्याच्या ठिकाणी रस्ता चांगला असणे गरजेचे

  • साइडपट्ट्या भरण्याची गरज

पिराची कुरोली ते वाखरी

  • रिंगणाच्या ठिकाणी उड्डाणपूल असल्याने सेवा रस्ता रुंद असावा

  • नव्याने झालेल्या प्रशस्त मार्गावर दुभाजकांची गरज

  • वाखरीजवळ एक किलोमीटर रस्ता खराब

वाखरी ते पंढरपूर

  • दूध पंढरीजवळ रस्त्यावर खड्डे

  • पूर्ण रस्त्याच्या साइडपट्ट्या भरण्याची गरज

वारकऱ्यांना सुखकारक व्हावे, यासाठी राष्ट्रीय पालखी महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र, यंदा या मार्गावरून चालताना वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी. तळावर वारकऱ्यांना सोईसुविधा देण्यासाठी सरकारी यंत्रणेने सहकार्य करावे.

- नितीन महाराज मोरे, अध्यक्ष, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा

वारकऱ्यांच्या सोईच्या दृष्टीने देवस्थानला काही बदल करावे लागत आहेत. सोहळ्यात वाढणाऱ्या वारकऱ्यांचा विचार करून आगामी काळात काही मुक्कामांमध्ये कालानुरूप बदल करावे लागतील. देहूतील इनामदारवाड्याचे, तसेच पंढरपूरमधील संत तुकाराम महाराज मठाचे विस्तारीकरण गरजेचे आहे.

- माणिक महाराज मोरे, सोहळाप्रमुख, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com