संत तुकाराम महाराज पादुकांचे पूजन

संत तुकाराम महाराज पादुकांचे पूजन
Published on

चिंचवड, ता.९ ः जगद्‍गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आकुर्डी येथील श्री खंडोबा मंदिरात मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.
एकादशीचे औचित्य साधून मंदिरात पहाटे पाच वाजता शंकराच्या पिंडीस तसेच श्री खंडोबा मूर्तीस महाअभिषेक करण्यात आला.त्यानंतर काकड आरती झाली. सकाळी नऊ वाजता चक्रेश्वर महिला भजनी मंडळाच्या वतीने भजनसेवा सादर करण्यात आली.
पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी मंदिराबाहेरील रस्त्यावर फुलांच्या पाकळ्यांची आकर्षक सजावट करण्यात आली. फुलांच्या पाकळ्यांवरून पालखी रथ मंदिराच्या प्रांगणात उभारलेल्या मंडपाखाली आणण्यात आला. यावेळी आकाश काळभोर (सपत्नीक) तसेच जयदीप खापरे (सपत्नीक) यांच्या हस्ते पालखीतील पादुकांचे पूजन व आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांनी पादुकांचे दर्शन घेतले. खंडोबा देवस्थान, व्यापारी व परिसरातील भाविकांच्या योगदानातून उपस्थित भाविकांसाठी खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
पालखी सोहळ्याचे प्रमुख व विश्वस्त उमेश महाराज मोरे, अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विश्वस्त सुनील महाराज मोरे, पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तानाजी काळभोर, उपाध्यक्ष सोमनाथ काळभोर, खजिनदार जंगली महाराज काळभोर, सचिव भाऊसाहेब काळभोर, कार्याध्यक्ष शंकर काळभोर, विश्वस्त ॲड. राजेंद्र काळभोर आदींनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com