Ram Mandir : संत तुकाराम महाराज यांच्या दृष्टांतानुसार श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेले १२ व्या शतकातील धामणीतील मंदिर

श्रीकृष्ण यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती वर काढण्यात आल्या संत तुकाराम महाराज यांच्याच हस्ते त्या मुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली
१२ व्या शतकातील धामणीतील श्रीराम मंदिर
१२ व्या शतकातील धामणीतील श्रीराम मंदिर Sakal

पारगाव : संत तुकाराम महाराज यांनी स्वप्नातील दृष्टांता नुसार पाण्याच्या आडातून श्रीरामाची मुर्ती वर काढून तिची प्रतिष्ठापना केलेले धामणी (ता. आंबेगाव ) येथील श्रीराम मंदिर आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वात पुरातन म्हणजे १२ व्या शतकातील श्रीराम मंदिर म्हणून ओळखले जाते दरवर्षी रामनवमीला राज्यभरातून हजारो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात.

येथील श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी मुकुंद लक्ष्मण क्षीरसागर या पुरातन मंदिराबाबत आख्यायिका सांगताना म्हणाले आमची सातवी पिढी मंदिरातील पूजा अर्चा करण्याचे काम करत आहे.

आमच्या पूर्वजांकडून असे सांगितले जाते कि संत तुकाराम महाराज प्रवासात धामणी येथे मुक्कामी असताना रात्री कीर्तन झाल्यावर झोपल्यानंतर मध्यरात्री त्यांना दृष्टांत झाला कि या ठिकाणी जमिनी खाली आडात श्रीरामाची मूर्ती असुन आहे मला वर काढा .

दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील ग्रामस्थांना बोलाऊन हा प्रकार सांगितला ग्रामस्थांच्या मदतीने जमिनीतील मोठ्या दगडांच्या खाली गाडलेल्या आडात असलेल्या श्रीराम, लक्ष्मण, सीता, विठ्ठल रुक्मिणी,

श्रीकृष्ण यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती वर काढण्यात आल्या संत तुकाराम महाराज यांच्याच हस्ते त्या मुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली त्या ठिकाणी दगडी गाभाऱ्याचे मंदिर बांधण्यात आले अलीकडच्या ५० ते ६० वर्षापर्यंत मुर्ती सापडलेले दगडी आड गाभाऱ्यात तसाच होता आता त्यावर फरशी बसवून तो बंदिस्त करण्यात आला असल्याचे मुकुंद क्षीरसागर यांनी सांगितले.

येथील श्रीराम मंदिर १२ व्या शतकातील असून संत ज्ञानेश्वर त्यांच्या भावडांसह नेवासा येथून आळंदीला जात असताना धामणी खिंड येथे काही वेळ थांबून धामणीतील श्री खंडोबा व श्री. श्रीरामाच्या मंदिराचे दर्शन घेतलेला उल्लेख प्राचीन ग्रंथात आढळतो पुढे ते केंदूर मार्गे आळंदीला गेलेला उल्लेख आहे.

१६ व्या शतकात यवनांच्या हल्यातून देवाच्या मूर्तींचे संरक्षण होण्यासाठी तत्कालीन पुजाऱ्याने त्या सर्व मुर्ती मंदिरातील पाण्याच्या आडात टाकल्या होत्या संत तुकाराम महाराज धामणी येथे आले असता त्यांना मुर्तीबाबत दृष्टांत झाला असल्याचा उल्लेखही प्राचीन ग्रंथात आढळतो अशी माहिती धामणी परिसरातील मंदिरांचे अभ्यासक प्रकाश पाटील जाधव यांनी सांगितले.

मंदिर परिसरात वासुदेव महाराज क्षीरसागर यांची संजीवन समाधी आहे. मुख्य गाभाऱ्याच्या समोर सागवानी नक्षीदार लाकडी खांब असलेला पेशवे कालीन कौलारू सभामंडप आहे. दरवर्षी रामनवमी उत्सव व गोकुळअष्टमीला अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते असे श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

दि. २२ जानेवारी रोजी अयोद्ध्या येथे नवीन श्रीराम मंदिराचा कलशारोहण तसेच रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होत आहे. त्या दिवशी धामणी येथील पुरातन श्रीराम मंदिरात धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, पालखी मिरवणूक, शोभायात्रा, महाप्रसाद आदी कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, माजी सरपंच सागर जाधव यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com