शिरूर तालुक्यात संताजी-धनाजीची जोडी चर्चेत

नागनाथ शिंगाडे
शुक्रवार, 13 जुलै 2018

तळेगाव ढमढेरे (पुणे): चांगले काम व एकनिष्ठता याची दखल राजकारणात वरिष्ठ घेतात, याची प्रचिती तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील दोन सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाच्या पावतीतून मिळाली आहे. शिरूर बाजार समितीचे तज्ज्ञ संचालक संभाजी ढमढेरे (संताजी) व तालुका दक्षता समितीचे सदस्य संदीप ढमढेरे (धनाजी) यांची जोडी सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

हे दोघेही आमदार बाबूराव पाचर्णे यांचे खंदे समर्थक आहेत. याची उतराई म्हणून श्री पाचर्णे यांनी दोघांनाही वरील पदे बहाल केली आहेत. तळेगाव ढमढेरे ते बाजारमैदान या मुख्य रस्त्याचे उदघाटन नुकतेच पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते व आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या अध्यक्षतेखाली तळेगाव ढमढेरे येथे झाले. या कार्यक्रमात दोघा कार्यकर्त्यांचा सत्कार गिरीश बापट व बाबूराव पाचर्णे यांच्या
हस्ते करण्यात आला.

तळेगाव ढमढेरे येथील मुख्य रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून अत्यावस्था झाली होती. आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या विशेष प्रयत्नातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्यासाठी तातडीचा निधी उपलब्ध करून दिला. या रस्त्याचे सुमारे दीड महिना काम चालू होते. या कामाची संपूर्ण जबाबदारी धनाजी (संदीप ढमढेरे) यांनी जबाबदारीने पार पाडली. ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक वातावरणाला न जुमानता सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत रस्त्यावर थांबून अधिकारी व मजूरांकडून उत्कृष्ट काम करून घेतले. कधीही पाहिले तर धनाजी रस्त्याच्या कामात सेवाभावीवृत्तीने व्यग्र दिसत असे. याची दखल ग्रामस्थ व आमदार पाचर्णे यांनी घेतली. कार्यकर्ता कसा असावा याचे जीवंत उदाहरण धनाजीच्या रूपाने तळेगावकरांना पाहायला मिळाले.

तळेगाव ढमढेरे येथे आमदार केंव्हाही आले तरी संताजी व धनाजीची जोडी त्यांच्याबरोबर असतेच. परिसरात आमदारांची संताजी व धनाजीची जोडी सध्या चर्चेचा विषय़ झाली आहे.

Web Title: Santaji Dhanaji couple hit in Shirur taluka