संतोष आनंद यांनी जिंकली मने

संतोष आनंद यांनी जिंकली मने

पुणे - ते आले, बोलले आणि जिंकून गेले... ते कोण, तर हिंदी चित्रपट विश्‍वातील नावाजलेले गीतकार संतोष आनंद. त्यांच्या कवितेतील प्रत्येक शब्दाला टाळ्या आणि वाहवा मिळत होती. तरुणाईला साद घालत त्यांनी काव्यमैफल गाजवली. ‘एक प्यार का नगमा है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है...’,  या गाण्यावर तरुणाईने रंगमंचासमोर उभे राहून त्यांना दाद दिली. 

श्री महावीर जैन महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित ‘डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल’मध्ये कवी संमेलन झाले. दकनी अदब फाउंडेशनने आयोजित केलेल्या या फेस्टिव्हलचा रविवारी शेवटचा दिवस होता. ‘सकाळ’ या कार्यक्रमाचा माध्यम प्रायोजक होता. 

८० वर्षे वय असलेल्या आनंद यांनी सादर केलेल्या कविता आणि गीतांना मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांनी नव्या पिढीतील हुशारीचे कौतुक केले. ‘एक प्यार का नगमा है...’ या गीताने तर त्यांच्यासोबत संमेलनात उपस्थितांनाही गायला भाग पाडले. तरुणाईचा भरभरून 

प्रतिसाद पाहून आनंद 
भावूक झाले. ‘मै यहाँ से जाना नहीं चाहता हूँ’, असे म्हणत त्यांनी तरुणाईलाही भावूक केले. ‘मला  लहानपणी कल्लू म्हणायचे, नंतर लंगडा. मग संतोष. 

आता संतोष आनंद किंवा दादा म्हणतात,’ असे सांगत त्यांनी आपली संघर्षमय यशोगाथा सांगितली. 

आनंद यांनी क्रांती आणि प्रेमरोग या विषयांना वाहिलेल्या आपल्या कविता ऐकवल्या. फेस्टिव्हलमधील वातावरणात आनंद यांच्या गीतांनी चैतन्य निर्माण केले. त्यांच्यासमवेत मोनिका सिंग, बनज कुमार, अमन अक्षर, योजना यादव, राजेंद्र श्रीवास्तव, सुनयना कचरू, टिकम शेखावत, महेश लोंढे या कलाकारांनी आपल्या कविता, दोह्यांचे सादरीकरण केले. त्यानंतर अमीरा पाटणकर यांचे कथक नृत्य आणि विजय तेंडुलकर यांच्या ‘पंछी ऐसे आते हैं’ या नाटकाचे सादरीकरण झाले.

रेगे आणि केशवसुतही
अभिनेते सचिन खेडेकर यांनी पु. शि. रेगे आणि केशवसुत यांच्या अप्रकाशित कवितांचे सादरीकरण केले. खेडेकर म्हणाले, ‘‘जी कविता वाचल्यानंतर मला दुसऱ्या कुणालातरी कधी एकदा वाचून दाखवतो, असे वाटते तीच कविता उत्तम असल्याचे मी समजतो.’ खेडेकर यांनी केशवसुत यांच्या ‘काठोकाठ भरू द्या प्याला’, ‘स्फूर्ती’, ‘सतारीचे बोल’ या कविता, तर रेगे यांच्या ‘लिलीची फुले’, ‘देशांतरीच्या गोष्टी सांगता’, ‘तुझे आसू माझे आसू’, ‘विचारीले मज त्यांनी’, ‘दार’ अशा कविता ऐकवल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com