
Santosh Dhumal Booked Under MCOCA for Threatening Former Associate
Esakal
पुण्यातील घायवळ टोळीचा "प्रतिस्पर्धी" असलेल्या संतोष धुमाळ याच्यावर मोक्का दाखल करण्यात आलाय. घायवळ टोळीच्या "टार्गेट" वर हाच संतोष धुमाळ होता अशी चर्चा रंगली आहे. संतोष धुमाळ हा एकेकाळी निलेश घायवळ टोळीतला सक्रीय सदस्य होता. त्याच्यावर आतापर्यंत १६ गुन्हे दाखल आहेत. आता १० लाखांच्या खंडणी प्रकरणी धुमाळवर मोक्का दाखल केला आहे. आखाडे नावाच्या तरुणाने याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.