

Santosh Pandit Latest News pune
esakal
Santosh Pandit Statement : युट्युबर संतोष पंडित यांना न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. १६ सप्टेंबर रोजी जामीन मंजूर झाल्यानंतर बुधवारी (ता. १७) त्यांची येरवडा कारागृहातून सुटका झाली. जामीन देताना न्यायालयाने त्यांना फिर्यादीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क साधू नये तसेच पुराव्यांशी छेडछाड करू नये, अशा अटी घातल्या आहेत.