अपघातग्रस्त संतोषला हवा मदतीचा हात

पराग जगताप
मंगळवार, 15 मे 2018

ओतूर ता.जुन्नर - येथील संतोष अहिलाजी शेटे वय.39 यांना वैद्यकिय उपचारासाठी साडे आठ लाख रुपयाची आवश्यकता असुन, शेटे कुटुंबाची आर्थिक स्थिती नाजुक आहे, तरी दानशुर व्यक्तीनी उपचारासाठी त्याना आर्थिक मदत करावी असे आवाहन नातेवाईकांकडुन करण्यात आले आहे.

उदरनिर्वाहसाठी शेती व मोलमजुर करणारे संतोष शेटे यांचा 8 मे ला ओतूर धोलवड मार्गावर ते पायी चालत असताना दुचाकीने धडक दिल्याने त्यांचा अपघात झाला.  त्यात त्याना डोक्याला गंभीर जखमी झाली, तेव्हा पासुन पुणे येथिल कासारवाडीतील मॅक्स न्युरो हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या कुटुंबाचे वार्षीक आर्थिक उत्पन्न 50 हजारा पेक्षा कमी आहे. तसेच त्यांचा मुलगा दुसरीत व मुलगी पाचवीत शिकत आहेत. हॉस्पिटलने त्याना वैद्यकीय उपारासाठी 8 लाख 45 हजार इतका खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले असुन, तो त्यांच्या कुटुंबाला पेलवणे शक्य नाही. तरी समाजातील दानशूर व्यक्तीनी त्याना आर्थिक मदत करावी असे आवाहन त्यांच्या कुटुंबीया कडुन करण्यात आले आहे. अधीक माहितीसाठी त्याचे बंधु संदिप शेटे याना 9595959774 या क्रमांकावर संपर्क साधावा.

मदतीसाठी खालील खात्यात रक्कम पाठवावी.
शेटे संतोष अहिलाजी,
जनता सहकारी बॅक शाखा ओतूर
A/C NO.....033220100015285
IFSC Code....JSBP0000033

Web Title: santosh shete wants help