पोटाच्या खळगीपुढे जगण्या-मरण्याच्या भिती काय करायचे साहेब!

संतु व त्याची पत्नी सजनी नट हे कुटुंब छत्तीसगडमधील बिलासपुर स्टेशनमधील मल्हार पचपेडी गावचे रहिवासी आहेत. पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या संतु व त्याची पत्नी रजनी यांना दोन मुले व तीन मुली आहेत.
Santu Nat
Santu NatSakal
Summary

संतु व त्याची पत्नी सजनी नट हे कुटुंब छत्तीसगडमधील बिलासपुर स्टेशनमधील मल्हार पचपेडी गावचे रहिवासी आहेत. पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या संतु व त्याची पत्नी रजनी यांना दोन मुले व तीन मुली आहेत.

पुणे - शनिवारी सकाळी साडे सहा वाजताची वेळ, अवघ्या 10-12 वर्षाची मुलगी तांबडी जोगेश्‍वरी जवळच्या परिसरात पाच - सात फुट उंच लावलेल्या दोरीवरुन चालत खेळ (खेल तमाशा) करीत होती, ये-जा करणारे नागरीक थोडे पैसे टाकून पुढे जात होते, त्या दोरीवरुन मुलगी तोल सांभाळत खाली उतरली आणि सगळ्यांनी सुटक्‍याचा निःश्‍वास टाकला, तेव्हा, 'मुलगी खाली पडण्याची भिती तुम्हाला वाटत नाही का, असा प्रश्‍न विचारला, तेव्हा, मिळालेले 'दोरीवर खेळ सादर करताना आपले लेकरू खाली पडण्याची भिती तर वाटणारच ना, पण आम्ही खाली थांबून तशी काळजीही घेतो. पण शेवटी पोटाच्या खळगीपुढे जगण्या-मरण्याच्या भितीचे काय घेऊन बसलात साहेब', संतु नट याच्या उत्तराने अक्षरशः काळजाचा ठाव घेतला!

संतु व त्याची पत्नी सजनी नट हे कुटुंब छत्तीसगडमधील बिलासपुर स्टेशनमधील मल्हार पचपेडी गावचे रहिवासी आहेत. पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या संतु व त्याची पत्नी रजनी यांना दोन मुले व तीन मुली आहेत. त्यातील 12 वर्षाची सर्वात मोठी मुलगी सजनी त्यांच्या "खेल तमाशा'मध्ये (दोरीवरील खेळ) त्यांना साथ देते. तिच्या दोरीवरच्या खेळाच्या सादरीकरणातुन मिळणाऱ्या पैशांमधून संतु-सजनीच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.नेहमीप्रमाणे दोघेही आपल्या कुटुंब कबिल्याला घेऊन गणेशोत्सवासाठी काही महिन्यांपुर्वी पुण्यात आले. मागील दहा दिवसांपासून प्रमुख रस्ते, चौकांमध्ये थांबून त्यांचे कुटुंब खेळ सादर करते, त्यातुनच त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्‍न सुटतो. त्याव्यतिरीक्त हातामध्ये पैसे राहात नसल्याचे संतु सांगतो.

संतु सांगतो, 'लोक मला म्हणतात, तुम्ही मुलांच्या जीवावर बसून खाता, पण तसे नाही. मी स्वतः मिळेल ते काम करतो, शेतात मजुरी करतो. गावाकडे गेल्यानंतर कंपनीमध्येही काम करतो. त्यावर कुटुंबाची गुजराण करतो. त्यानंतर यात्रा, जत्रा, दिवाळी, गणपती, नवरात्र अशा सणांच्यावेळी आम्ही गावोगावी जातो. तिथे आमचा "खेल तमाशा' सादर करतो. त्यातुन दोन पैसे मिळतात, पण कुटुंबाला दोन वेळेला पोटभर अन्न देऊ शकेल, इतकेही पैसे मिळत नाहीत. त्यावेळी पत्नी, मी पोटाला चिमटा घेऊन, मुलांना पोटभर जेवायला देतो,''

'तुम्ही हेच काम का करता, तुम्हाला दुसरे काम करता येत नाही का ?' असा प्रश्‍नही काही व्यक्ती आम्हाला विचारता, तेव्हा हो मी काहीही काम करु शकतो, पण कोणीतरी माझ्या हाताला चांगले काम तरी द्या, एकदा विश्‍वास दाखवा. मलाही वाटतं, तुमच्या सगळ्यांसारखे माझ्याही मुलांना शाळेत टाकावे, त्यांना चांगले शिक्षण द्यावे. पण परिस्थितीमुळे ते शक्‍य होत नाही,' संतु सांगत होता. 'मुलगी दोरीवरुन खाली पडण्याची भिती वाटत नाही का 'या प्रश्‍नावर संतु म्हणतो,' खेळ सादर करताना मुलगी दोरीवरुन खाली पडू नये, यासाठी मी किंवा माझी पत्नी खाली थांबतो. त्यामुळे जास्त धोका होत नाही. पण शेवटी पोटाच्या खळगीपुढे जगण्या मरण्याचा प्रश्‍न येतो कुठे ?' त्याचा हा प्रश्‍न काळजावर खोल रुजत गेला. पोलिस उठवतील याची भिती वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com