sarasbaug pune
sakal
पुणे - कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहित धरून पुणे महापालिकेने गुरुवारी (ता. २८) आणि शुक्रवारी (ता. २९) सारसबाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान सुरुवातीला दुरुस्तीच्या कारणास्तव बाग बंद असल्याचे महापौर मंजूषा नागपुरे यांनी जाहीर केले होते. पण त्यानंतर पोलिसांचा दाखला देत बाग बंद असणार आहे असे स्पष्ट केले. त्यावरून सत्ताधाऱ्यांचा गोंधळही समोर आला आहे.