Love Parents, Respect Parents : 'सरहद्द'च्या मुलांचा समाजाला संदेश

Sarhad school Children gave Message to community about to Love and Respect Parents
Sarhad school Children gave Message to community about to Love and Respect Parents
Updated on

पुणे : सामाजिक माध्यमांच्या वापरामुळे पालक आणि पाल्यांमधील संवादाची दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे पाल्यांचा पालकांकडे बघण्याचा दृष्टिकोनही नकारात्मक बनू लागल्याचे चित्र समाजात पहावयास मिळू लागले आहे. विशेष म्हणजे यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न खुद्द शालेय विद्यार्थ्यांनीच सुरू केला आहे. यासाठी पुण्यातील सरहद शाळेतील पहिली ते पाचवीच्या वर्गातील मुलांनी पुढाकार घेत, ''Love Parents, Respect Parents''चा संदेश समाजाला दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अर्थात यासाठी निमित्त ठरले ते शाळेचे वार्षिक स्नेहसंम्मेलनाचे. या वार्षिक संमेलनाची संकल्पना ही केवळ पालक आणि पाल्य या एकाच विषयावर आधारित होती. यानिमित्ताने या विद्यार्थ्यांनी गीत, पथनाट्य, समूहनृत्य, लघुपट आदी विविध कलाकृतीच्या माध्यमातून उपस्थित प्रेक्षकांसमोर तब्बल तीन तास "आई-वडिलांवर प्रेम करा, त्यांचा आदर करा' या एकाच विषयावर जनजागृती केली.

शिवनेरी ते सारंगखेडा 'त्याने' 5 दिवसांत गाठला पण...
 

अगदी सहा वर्षे वयापासून अकरा वर्षांपर्यंत वय असलेले हे सर्व शालेय विद्यार्थी होते. शिवाय हे सर्व विद्यार्थी काही सीबीएसई, आयसीएसई बोर्डाचे नव्हे तर चक्क एस. एस. सी. बोर्डाच्या शाळेचे विद्यार्थी आहेत. त्यांच्या या कल्पक कल्पनेला उपस्थित प्रेक्षकांनीही मोठी दाद दिली.

सरहद शाळेच्या गुजरवाडी शाळेचे नववे वार्षिक संमेलन सोमवारी (ता.23) पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्या संमेलनात त्यांनी समाजाला हा संदेश दिला आहे. या संमेलनाचे उद्‌घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, संस्थेच्या सचिव सुषमा नहार, विश्‍वस्त शैलेश वाडेकर, केंद्रप्रमुख पांडुरंग ताठे, गुजरवाडीचे सरपंच व्यंकोजी खोपडे, सुजाता गोळे,मनिषा वाडेकर, मयुर मसूरकर, मंजूर बशीर आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com