Video : पुण्याचे लिट्ल चॅम्प्स मागे टाकतील भल्या भल्या गणिततज्ञांना; पहा कोण आहेत ते?

Pune students win silver and bronze medals at International Memoriad Turkey Open Championship
Pune students win silver and bronze medals at International Memoriad Turkey Open Championship
Updated on

पुणे : ''कोणत्याही आठ आकडी संख्येला तितक्‍याच आकड्यांच्या संख्येने गुणाकार करायला तुम्हाला किती वेळ लागतो? हेच गणित अवघ्या 30 ते 40 सेकंदांमध्ये सोडवणाऱ्या मुलांना तुम्ही काय म्हणाल? जिनिअस स्टूंडंट! हे जीनीअस चक्क आपल्या पुण्यात आहे. कितीही मोठी संख्या असू द्यात, त्यांचा गुणाकार, वजाबाकी आणि भागाकार ही मंडळी तोंडपाठ असल्यासारखे क्षणात सांगतात; तेव्हा मात्र भल्याभल्यांचे बोट तोंडात जाते. या जिनिअस विद्यार्थ्यांनी टर्कीत झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवीत पुण्याच्या लौकिकात भर घातली आहे. 



शिक्रापूर, लोणीकंद हद्दीत सर्व गावांमध्ये फ्लेक्‍सबंदी

आंतरराष्ट्रीय स्तरावरील टर्कीत झालेल्या "मेमोरियाड टर्की ओपन चॅम्पियनशिप'मध्ये या विद्यार्थ्यांनी रौप्य आणि कांस्यपदके पटकावली. यामध्ये स्वानंद भोरे (वय 9) याने दोन रौप्यपदके, ऋचिता शिरसाठ (वय 9), निसर्ग घुलेश्र (वय 13) आणि मोहित सातपुते (वय 11) यांनी प्रत्येकी एक रौप्य, तसेच प्रयान मुथा (वय 8) याने एक कांस्यपदक पटकाविले. "जिनिअस किड' या संस्थेचे हे विद्यार्थी आहेत.

‘पिफ’मध्ये १४ आंतरराष्ट्रीय चित्रपट

आधुनिक जीवनात संगणकशास्त्र, कृत्रीम बुद्धीमत्ता आणि वेगवान तार्किकी प्रक्रीयेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यासाठी गणिती आणि तार्किकी प्रक्रिया क्षणार्धात करता येणे आवश्‍यक आहे. चिमुकल्यांनी या स्पर्धेत दैदीप्यमान यश संपादन करत भविष्याच्या अवकाशाला गवसनी घातली आहे. 

मंत्रिमंडळ विस्ताराला कॉंग्रेसचे "ग्रहण'..! 

प्रशिक्षक आनंद महाजन म्हणाले, ""विद्यार्थ्यांमध्ये आम्ही एकाग्रता, संयम, तार्किक प्रक्रियेतील वेग वाढविण्यासाठी प्रशिक्षण देतो. तसेच टीव्ही, मोबाईलसारख्या लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून आम्ही त्यांना दूर ठेवतो. यश संपादन केल्यामुळे त्यांच्यामधील आत्मविश्‍वासात वाढ झाली आहे.''

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शलाका केरिंग आणि मोनिता महाजन यांनीही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. 
केरिंग म्हणाल्या, "संस्थेने आजपर्यंत 12 वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकल्या असून, टर्कीतील ही चॅम्पियनशिप सलग पाचव्यांदा जिंकली आहे.'' स्वानंद म्हणतो, "मी रोज 10-12 तास सराव करायचो. यामध्ये माझी आई मला खूप मदत करायची.'' तर ऋचिता म्हणाली, "मी आठ अंकी संख्येचा आठ अंकी संख्येशी गुणाकार करणे या स्पर्धेत पदक प्राप्त केले. यामुळे माझा आत्मविश्‍वास वाढला असून, भविष्यात मी "आयपीएस' बनणार आहे.'' संस्थेचे संस्थापक युझेबियस नोरोन्हा यांचे विशेष मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. 

Video : कचऱ्यातले गाठोडं उघडलं अन् बाळं दिसलं...

''एकीकडे लहान मुले मानसिक ताणतणावाचे बळी पडत असताना त्यांच्यासाठी पूरक आणि सकारात्मकता वाढविणारा कार्यक्रम या स्पर्धेच्या रूपाने मिळाला आहे. माझा विश्‍वास आहे, की देशाचे भविष्य अशा मुलांमुळे निश्‍चित उज्ज्वल असेल.''
- आनंद महाजन, प्रशिक्षक, जिनिअस किड ऍकॅडमी 

फडणवीस म्हणतात, लेकीला वेळ देऊ शकलो नाही अन् तुम्ही म्हणता...

''स्पर्धेत यश प्राप्त केल्यामुळे माझ्या मुलामधील आत्मविश्‍वास खूप वाढला आहे. तो स्वतः निर्णय घेण्यासाठी आता सक्षम असून, यामुळे शालेय अभ्यासातही खूप मदत झाली आहे.'' 
- मेधा सातपुते, पालक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com