सारिका आता पदक घेऊनच परत येणार

सारिका आता पदक घेऊनच परत येणार

कडूस - ‘खेलो इंडिया’ स्पर्धेसाठी निवड झालेल्या; पण आर्थिक परिस्थितीमुळे मैदान सोडून देण्याच्या विचारात असलेल्या पाईट- रौंधळवाडी (ता. खेड) येथील सारिका शिनगारे हिला ‘सकाळ’मुळे मोठा आधार मिळाला. तिच्या मदतीसाठी ‘सकाळ’ने केलेल्या आवाहनाला दानशूर व्यक्तींकडून मोठा प्रतिसाद मिळाला. तिच्या बॅंक खात्यात दोन दिवसांत सव्वादोन लाखापेक्षा जास्त रक्कम जमा झाली. 

सारिकाने शालेयस्तरापासून राष्ट्रीयस्तरापर्यंतच्या शेकडो वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली. भुवनेश्वर येथील खेलो इंडिया स्पर्धेसाठी तिची निवड झाली. पण, पैशाअभावी खेळ सोडून देण्याच्या विचारात ती होती. त्यामुळे आर्थिक बळ देण्याचे आवाहन ‘सकाळ’ने सोमवारी (ता. २४) केले. जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील व मित्रमंडळींनी चाळीस हजार रुपये जमा केले. यात बुट्टे पाटील यांनी वीस हजार, रौंधळवाडी ग्रामस्थांनी दहा हजार, नवनाथ पोटवडे यांनी पाच हजार व दत्ता रौधळ, संजय रौधळ, काळूराम पिंजन, बाळासाहेब ओझरकर, दिलीप वाळके यांनी मदत केली. सातकरस्थळचे माजी सरपंच अजय चव्हाण व मित्र परिवाराने एकवीस हजार; तर राजगुरुनगर सहकारी बॅंकेचे संचालक दिनेश ओसवाल यांनी तीन हजाराचा धनादेश सारिका हिची आई छाया व भाऊ मंगेश यांच्याकडे सुपूर्द केला. अनेकांनी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीकडे मदतीबाबत इच्छा व्यक्त केली. दोंदे ग्रामपंचायतीचे सदस्य सिद्धार्थ कोहीनकर, सुभाष टाकळकर व योगेश धायबर यांनी मदत करणार,’ असे सांगितले. 

मदतीबद्दल मी ऋणी आहे. मला भावनासुद्धा व्यक्त करता येत नाहीत. असंख्य शुभेच्छा पाठीशी असल्याने आत्मविश्वास वाढला आहे. मी पदक घेऊनच येईन.
 - सारिका शिनगारे, वेटलिफ्टिंगपटू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com