
हिंजवडी ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश जांभुळकर यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात पुणे दौऱ्यावेळी सुनावलं होतं. सरपंच जांभुळकर यांना अजित पवार यांनी खडसावतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. आता त्या प्रकारावर सरपंच जांभुळकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. तसंच अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत भूमिका मांडली आहे.